मुंबई : अभिनेत्री अदा शर्माचे काही फोटो सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहेत. अदाचे हे फोटो एअरपोर्टवरील आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोंची सोशल मीडियात चांगलीच चर्चा रंगली असून अनेक मोठ्या अभिनेत्रींच्या हॉट फोटोंना ती टक्कर देत असल्याचे प्रतिक्रिया उमटत आहे. 




अदाने तिच्या ‘अदा की अदा’ या इन्स्टाग्राम पेजवर हे फोटो शेअर केले आहेत. नेहमीच बबली लूकमध्ये दिसणारी अदा इतक्या हॉट अंदाजात दिसल्याने अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. अदाने २००८ मध्ये आलेल्या १९२० या विक्रम भटच्या हॉरर सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 




त्यानंतर अदाने कमांडो २ या सिनेमातही काम केलं होतं. त्यानंतर मात्र तिचा कोणताही सिनेमा रिलीज झाला नाही. पण सोशल मीडियात मात्र ती नेहमीच चर्चेत असते. अदाने काही तेलगु सिनेमांमध्येही काम केलं आहे.