Adipurush Director Om Raut On Negative Reviews: 'आदिपुरुष' (Adipurush) चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक ओम राऊत (Adipurush Director Om Raut) यांनी बॉलीवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं आहे. मात्र ओम राऊत यांच्या पहिल्याच प्रयत्नाला नकारात्मक रिव्ह्यू मिळत असून चित्रपटावरुन अनेक वादांना तोंड फुटलं आहे. मात्र असं असलं तरी चित्रपटाची कमाईच्याबाबतीत उत्तम घौडदौड सुरु आहे. चित्रपटाने प्रदर्शनानंतर 2 दिवसांमध्येच जागतिक स्तरावर 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. नकारात्मक रिव्ह्यूजचा पाऊस पडत असतानाही या चित्रपटाने सोमवारी (18 जून 2023 रोजी) भारतामध्ये 64 कोटींची कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे. ही आकडेवारी पाहून राऊत यांनी समाधान व्यक्त केलं आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात मूळ कथेची मोडतोड करण्यात आल्याच्या टीकेवर ओम राऊत यांनी भाष्य केलं आहे. रामायण हे फारं मोठं आणि विस्तारित आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट रामायणाचा एक छोटा भाग असल्याचा दावा ओम राऊत यांनी केला आहे.


'जय श्री राम'च्या घोषणा ऐकून समाधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आदिपुरुष' चित्रपटाला नकारात्मक रिव्ह्यू मिळत असले तरी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षक 'जय श्री राम'च्या घोषणा देताना दिसत आहेत, असं ओम राऊत यांनी 'रिपब्लिक'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. चित्रपटगृहामध्ये 'जय श्री राम'च्या घोषणा देणारे प्रेक्षक पाहून मला फार आनंद होत असून अभिमान वाटतोय, असं ओम राऊत यांनी म्हटलं. "बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला मिळत असणारा प्रतिसाद हा जास्त महत्त्वाचा आहे. जागतिक स्तरावर पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत आम्ही फार उत्तम आकडे जमवले (कमाई केली) आहेत," असं ओम राऊत यांनी म्हटलं. या चित्रपटाने पहिल्या दिवशी जागतिक स्तरावर 140 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या आकडेवारीने 200 कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी 600 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.


नक्की पाहा >> Adipurush: क्रिती सेनॉनच्या आधी सीतेच्या भूमिकेसाठी 'या' 4 अभिनेत्री होत्या पहिली पसंत; पण...


'ते मी या चित्रपटामधून मांडण्याचा प्रयत्न केला'


आपण रामायण पूर्णपणे समजून घेतल्याचा दावा करणं चुकीचं असल्याचंही ओम राऊत यांनी म्हटलं आहे. "मी तुम्हाला सांगितलं की मला हे सर्व नाट्य समजलं आहे तर ती मी केलेली फार मोठी चूक ठरेल असं मला वाटतं. कारण माझ्या मते कोणकडेही संपूर्ण रामायण समजून घेण्याची क्षमता नाही," असं मत ओम राऊत यांनी मांडलं. "मात्र मी जे काही थोडंफार रामायण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. रामायणातील खारीच्या वाट्याप्रमाणे. मी जे काही समजून घेतलं आहे ते या चित्रपटामधून मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे," असं ओम राऊत यांनी सांगितलं. 


नक्की वाचा >> "9500 रुपये देतो फक्त..."; 'आदिपुरुष'च्या टीमकडून प्रेक्षकांना धक्कादायक मेसेजेस! Screenshots आले समोर


कोणी संपूर्ण रामायण समजल्याचा दावा करत असेल तर...


लहानपणापासून आपण जे रामायण टीव्हीवर पाहत मोठे झालो ते 'आदिपुरुष' चित्रपटापेक्षा अधिक मोठं कथानक आहे, असंही ओम राऊत म्हणाले. 'आदिपुरुष' चित्रपटामध्ये रामायणामधील एक विशिष्ट भागच दाखवण्यात आला आहे. या भागाला युद्धखंड असं म्हणतात, अशी माहिती राऊत यांनी दिली. "रामायण एवढं मोठं आहे की कोणालाही ते संपूर्ण समजून घेणं शक्य नाही. जर ते आम्हाला संपूर्ण रामायण समजलं असा दावा करत असतील तर ते वेडे असतील किंवा ते तुमच्याशी खोटं बोलत असतील," असं ओम राऊत आपली बाजू मांडताना म्हणाले.


नक्की वाचा >> 'आदिपुरुष'चे सर्व शो बंद पडणार? हिंदू समाजाच्यावतीने थेट हायकोर्टात याचिका


रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या रामायण मालिकेमध्ये रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी 'आदिपुरुष' चित्रपटासंदर्भात नाराजी व्यक्ती केली होती. मी अजून हा चित्रपट पाहिलेला नाही असंही अरुण गोविल म्हणाले आहेत.