वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रावणाच्या `त्या` लूकवर राऊतांनी दिली अशी प्रतिक्रिया
`आदिपुरुष` हा चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
मुंबई : बहुचर्चित आणि बहूप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा चित्रपट टीझर प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. व्हिएफएक्स आणि कलाकारांच्या लूकवरुन चित्रपटाला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. ‘आदिपुरुष’मधील सैफ अली खानचा (Saif Ali Khan) रावणाच्या भूमिकेतील लूक पाहून नेटकऱ्यांनी त्याची तुलना 'पद्मावत' या चित्रपटातील खिलजी या भूमिकशी केली. त्यामुळे चित्रपटाचा विरोध होत आहे. अनेकांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही केली आहे. चित्रपटाला होणारा विरोध पाहून दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी यावर वक्तव्य केलं आहे.
आणखी वाचा : ...म्हणून सलमान ऑनस्क्रीन कधीच Kiss करत नाही
‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांनी नुकतीच 'इंडिया टुडेला मुलाखत दिली. 'या चित्रपटातून श्रीराम यांची गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांचे विचार तरुण पिढीपर्यंत या माध्यमातून पोहोचवू इच्छितो. आजच्या नवीन पिढीला श्रीरामांची शिकवण द्यायची असेल तर आपल्यालाही त्यांची विचारसरणी, नवीन टेक्नोलॉजीचा वापर करूनच चित्रपटाची निर्मिती करावी लागेल. आम्ही चित्रपटात काहीही चुकीचे दाखविलेले नाही. प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य चित्रपट बनवताना राखलं गेलं आहे,' असे ओम राऊत म्हणाले.
आणखी वाचा : स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान करणं अभिनेत्रीला पडलं महागात, कॅमेरा समोर येताच...
पुढे ओम राऊत म्हणाले, 'आपण याआधी रावणाला कसं पाहिलं आहे, यावर ते अवलंबून आहे. माझ्यासाठी रावण आजही राक्षस आहे. परंतु, मी एका वेगळ्या नजरेने त्याच्याकडे बघतो. मी कल्पना केलेल्या रावणाला मोठी मिशी नाही आहे. पण यामुळे जर तुम्ही असं म्हणत असाल की, रावणाचं रंग आणि रुप मी बदललं आहे, तर ते चुकीचं आहे. कारण हा तोच धर्माचा रंग आहे', असं तो म्हणाला.
आणखी वाचा : 46 वर्षांच्या अमिषा पटेलनं बिकिनीमध्ये शेअर केला बोल्ड व्हिडीओ, पाहून नेटकरी हैराण
‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखविण्यात आलेल्या पुष्पक विमानचे रुप बदलण्याच्या चर्चेवरही ओम राऊत यांनी भाष्य केले. 'ते पुष्पक विमान आहे, हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुम्ही फक्त चित्रपटातील 95 सेकंद पाहिली आहेत.' (Adipurush Director Om Raut React On Critism Of Saif Ali Khan s Ravana Look )
आणखी वाचा : 'मी पक्षात प्रवेश...', शिंदे गटासोबत व्यासपीठावर दिसताच अवधूत गुप्तेची लक्षवेधी पोस्ट
पुढे चित्रपटावर होणाऱ्या ट्रोलिंगवर ओम राऊत म्हणाले, 'चित्रपटावर करण्यात येत असलेल्या प्रत्येक वक्तव्यावर आमचं लक्ष आहे. परंतु, जानेवरीमध्ये जेव्हा चित्रपट प्रदर्शित होईल, तेव्हा मी तुम्हाला निराश करणार नाही.' ‘आदिपुरुष’ चित्रपटात प्रभास, क्रिती सेनन, देवदत्त नागे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर हा चित्रपट 2023 मध्ये जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.