Adipurush Jai Shri Ram Song: येत्या जूनमध्ये 'आदिपुरूष' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांच्या ट्रेलरलाही अल्पावधीतच करोडो व्ह्यूज आले होते. आता या चित्रपटातील एक गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला 24 तास कोट्यवधींचे व्ह्यूज मिळाले आहेत. जय श्री राम या गाण्यानं काही तासातच रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यामुळे सध्या (Adipurush New Song) सगळीकडेच चर्चा आहे ती म्हणजे आदिपुरूषच्या या गाण्याची. सध्या या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत या गाण्याला युट्यूबवरून 31 मिलियन म्हणजे 3 कोटी व्ह्यूज आले आहेत. त्यामुळे सगळीकडेच या गाण्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदिपुरूष या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत (Om Raut) यांनी केले आहे. यामध्ये प्रभास, क्रिती सनन आणि सनी सिंग यांच्या महत्त्वपुर्ण भुमिका आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन हे भुषण कुमार, ओम राऊत, क्रिशन कुमार, राजेश नायर आणि प्रसाद सुतार यांचे आहे. हा चित्रपट येत्या 16 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. याआधी हा चित्रपट जानेवारीत प्रदर्शित होणार होता. व्हिएफएक्स आणि सीजीआयच्या वादामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन लांबले होते. 9 मेला या चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित झाला होता.


Kworb च्या डेटानुसार, आदिपुरूष चित्रपटातील या नव्या गाण्याला आत्तापर्यंत 26,291,237 व्ह्यूज मिळाले आहेत. अक्षय कुमारच्या क्या लोगे तुम या गाण्यालाही या गाण्यानं मागे टाकले आहे. या गाण्यानं शकिराच्याही एका नव्या गाण्याला मागे टाकलं आहे. 


हेही वाचा - "याबद्दल मला महिती नव्हतं पण..."; 200 कोटींच्या Necklace मुळे ट्रोल झालेल्या उर्वशीचा अजब सल्ला तुम्हाला पटेल?


आदिपुरूष या चित्रपटाविषयी अनेकांनाच उत्सुकता लागून राहिली होती. हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो आहे यासाठी चाहते आतूर होते. या चित्रपटाचा पहिला टिझर प्रदर्शित झाल्यानंतर मात्र या चित्रपटावरून बराच वाद रंगला होता. त्यामुळे यावेळी या चित्रपटाला सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या चित्रपटातील काही दृश्यं ही बदलण्यात आल्याचे समजते आहे. त्यातून नव्या ट्रेलरमध्येही बदल झाल्याचे दिसून आले आहे. असे असले तरी यावेळी मात्र या ट्रेलरवर काही दिग्गज कलाकारांनीही परत निशाणा साधला होता. रामायण मालिकेतील लक्ष्मणाची भुमिका करणारे सुनील लहरी यांनी यावेळी या ट्रेलरच्या एका दृश्यावर निशाणा साधला होता. 



परंतु असे अनेक चाहते आहेत ज्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे तशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावरून उमटताना दिसत आहेत.