हा आहे विराट-अनुष्काच्या लव्हस्टोरीचा ‘लव्ह गुरू’, याच्याकडे होती लग्नाची सर्व माहिती
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं अखेर लग्न झालं. प्रसिद्ध फिल्मेफेअर मॅगझिनने याबाबत वृत्त दिलं आहे.
नवी दिल्ली : विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचं अखेर लग्न झालं. प्रसिद्ध फिल्मेफेअर मॅगझिनने याबाबत वृत्त दिलं आहे.
यासोबतच विराट आणि अनुष्काचे लव्हगुरू कोण आहेत? याची चर्चा होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार दावा केला जातोय की, विराट कोहली आणि अनुष्काच्या लग्नाची माहिती सर्वातआधी फिल्ममेकर आदित्य चोप्रा याला होती. सूत्रांच्या हवाल्याने असेही म्हटले जात आहे की, गुपचूप झालेल्या या लग्न सोहळ्यात आदित्य चोप्रा यानेही हजेरी लावली आहे.
राणी मुखर्जीचंही इटलीत लग्न
असे सांगितले जात आहे की, आदित्य चोप्राने लपून अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत इटलीमध्ये लग्न केलं होतं. अनुष्काने जेव्हा इटलीमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तिने आदित्य चोप्राचा सल्ला घेतला होता. असे म्हट्ले जाते की, आदित्य चोप्रानेच अनुष्का शर्माला बॉलिवूडमध्ये उभं राहण्यासाठी मदत केली होती. आता तिच्या लव्हस्टोरीला लग्नापर्यंत पोहोचवण्यातही त्यानेच मदत केली आहे.
अनुष्काला तसं पाहणं विराटसाठी स्वप्नासारखं
२०१३ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का एक शॅम्पूची जाहीरात करत होते. यात दोघे पहिल्यांदाच ऎकमेकांच्या डोळ्यात बघताना दिसले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विराटने या गोष्टीचा स्विकार केला की, अनुष्काला पहिल्यांदा स्क्रीन न पाहता समोरा समोर बघणे स्वप्नासारखे होते. त्याने सांगितले की, पहिल्यांदा तिला पाहिले तेव्हा मी पाहतच राहिलो होतो.
ब्रेकअपच्या अफवा
फेब्रुवारी २०१६ मध्ये दोघांमध्ये प्रेम झालं हे सर्वांनाच माहिती आहे. पण फेब्रुवारी २०१६ मध्ये ही अफवा पसरली होती की, दोघांचं ब्रेकअप झालं आहे. अनुष्का लगातार यावरून ट्रोल होत होती आणि विराट लगातार पिचवर रन करत होता. त्यानंतर २०१६ मध्ये ट्विटरवरून विराट्ने टीकाकारांना चांगलेच झापले होते.