मुंबई : लोकप्रिय गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायणने अंधेरीतील लोखंडवाला सर्कलजवळ एका ऑटो रिक्षाला टक्कर मारली. या अपघातात ऑटो रिक्षा चालकाला आणि प्रवाशांना दुखापत झाली आहे. या प्रकरणातमुंबईच्या वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये आदित्य नारायण विरोधात आयपीसीच्या अंतर्गत 279 आणि 338 च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


आदित्यने मागितली माफी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु, अपघातानंतर आदित्यने माफी मागत जखमी झालेल्यांचा सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे. तो एक दुर्दैवी अपघात होता. जे काही झालं त्याबद्दल मी मागतो असे आदित्य ‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना म्हणाला. 


चुकीच्या गोष्टीमुळे यापूर्वीही आदित्य चर्चेत


चुकीच्या गोष्टीमुळे चर्चेत येण्याची ही आदित्यची पहिलीच वेळ नव्हती. तर यापूर्वीही एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यासोबत उद्धट बोलण्यामुळे चर्चेत आला होता. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.