मुंबई : प्रत्येकाला माहिती आहे की अभिनेता सलमान खान जितका कूल आहे. तितकाचं त्यांचा राग भयंकर आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सलमान खानसोबत पंगा घेणं सगळेचं टाळतात. मात्र एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता आदित्य रॉय कपूर सलमानवर  जोरात ओरडला.  एका मुलाखतीत स्वत: आदित्य रॉय कपूरने या घटनेचा खुलासा केला होता. एका चित्रपटामध्ये सलमानवर आदित्य जोरात ओरडला आहे.  2009 साली प्रदर्शित झालेला  ‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटातील हा किस्सा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘लंडन ड्रीम्स’ या चित्रपटात अभिनेता सलमान खान, अजय देवगन, आदित्य रॉय कपूर आणि रणविजय सिंह मुख्य भूमिकेत होते. पण या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाला यश मिळालं नाही. चित्रपटात आदित्यचा पहिला शॉटच सलमान खानसोबत होता.


सीनबद्दल सांगताना आदित्य म्हणाला, 'सीनमध्ये मला सलमान खानवर जोर जोरात ओरडायचं होतं. तो आमचा बॅण्ड सोडून जाणार म्हणून रागात त्याच्यावर ओरडायचं होतं आणि तशी सीनची गरज होते. पण तेव्हा माझ्या मनात भीती होती की मी सलमानला कसं ओरडणार. एवढी हिंमत मी कशी दाखवू  ' असं तो म्हणाला. 


पुढे आदित्य म्हणाला, 'त्या सीनसाठी मी फार रिटेक घेतले. पूर्ण सीनमध्ये सलमानचे डोळे बंद होते. अखेर मी सीन पूर्ण केला. त्यानंतर खुद्द सलमानने माझं कौतुक केलं. ' चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगणने मला फार मदत आणि पाठिंबा दिला.