Ananya Panday Aditya Roy Kapur Breakup : आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांनी कॉफी विथ करण या शोमधून आम्ही रिलेशनशिपमध्ये असं मान्य केलं होतं. ते दोघे अनेक वेळा एकत्र वेळ घालवतानाही दिसले आहेत. या दोघांच्या नात्याबद्दल चंकी पांडेने नुकतच भाष्य केलं होतं. तब्बल दोन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर जेव्हा की त्यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. अशात या आदित्य आणि अनन्या यांचं ब्रेकअप झाल्याची बातमी समोर येत आहे. अगदी गेल्या महिन्यापासून या नात्याला ब्रेक लागल्याची चर्चा सर्वत्र पसरली होती. अशात त्यांच्या जवळचा मित्र याने त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केलाय. (Aditya Roy Kapur and Ananya Pandey breakup amid marriage talk close friend said Two months ago)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरं तर अनन्या आणि आदित्य यांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्यानंतर त्यांच्या नात्यात काही बिनसलंय अशी चर्चा सुरु झाली होती. त्या दोघांचा कॉमन फ्रेंड याने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहिती या दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं. तो म्हणाला की, 'एक महिन्यापूर्वीच या दोघांच्या नात्याला ब्रेक लागला. दोघांमधील बॉण्डिंग खूप स्ट्राँग होतं. तरीदेखील हे दोघे वेगळं होणं हे आमच्यासाठी खूप धक्कादायक आहे.'


तो पुढे हेही म्हणाला की, 'अनन्या सध्या या ब्रेकअपच्या मानसिक झटक्यातून स्वत:ला सावरतेय. कोणासाठीही ब्रेकअप होणं ही दु:खदायक घटना असते. ती तिच्या मित्रांसोबत वेळ व्यतित करत आहे.' 


आदित्य गेल्या महिन्यात अनन्याची चुलत बहीण अलाना पांडेच्या डोहाळे जेवणाला दिसली होती. मात्र, त्यानंतर लगेचच आदित्य-अनन्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांनी जोर धरायला सुरु केली होती. अखेर त्यांच्या या नात्याबद्दल जवळच्या मित्राने माहिती दिली आहे. 



अनन्याची ही पोस्ट झाली व्हायरल 


गेल्या महिन्यात, अनन्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. ज्यात तिने लिहिलंय होतं की, 'जे खरोखर तुमच्यासाठी बनले असतील ते तुमच्याकडे परत येतील, ते फक्त तुम्हाला धडे शिकवण्यासाठी सोडून जातात. यातून तुम्ही शिकू शकता. जर ते खरोखर तुमच्यासाठी असतील तर तुम्ही त्यांना ढकललं तरीदेखील ते परत येतील.'