परदेशातून परतले अनन्या पांडे- आदित्य रॉय कपूर; आता देणार का प्रेमाची कबुली?
Ananya Pandey and Aditya Roy Kapoor Airport: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. नुकतेच ते एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. त्यामुळे त्यांचे फोटो झपाट्यानं व्हायरल होयला जास्त वेळ लागलेला नाही.
Ananya Pandey and Aditya Roy Kapoor : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांची. स्पेनच्या लिस्बनमध्ये ते दोघं जण स्पॉट झाले होते. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. लिस्बनमध्ये ते दोघं एकत्र स्पॉट झाले होते. त्यानंतरही त्यांचे अनेक फोटो हे व्हायरल झाले होते. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता ते दोघंही आपल्या स्पेनच्या वेकेशनवरून परत आले आहेत. सध्या ते दोघंही एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत त्यामुळे त्या दोघांची एकच चर्चा रंगली आहे. आता ते दोघं विवाहबंधनात अडकणार का इथपर्यंत चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांचा वेकेशनवरून परत येतानाचा व्हिडीओ हा व्हायरल झाला आहे. तिनं स्पेनमध्ये एन्जॉय करत असणारे आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे येथे मात्र चांगलेच व्हायरल झाले होते.
सातासमुद्रापारहून एकत्र वेळ घालवलेले हे दोघं आता आपल्या मायदेशी परतले आहे. सोशल मीडियावरून चाहत्यांनी त्यांचे चांगलेच स्वागत केले आहे. एअरपोर्टवर स्पॉट झालेल्या या दोघांची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ते दोघं स्पॉट होताच पापाराझींनी त्यांचे एकत्र फोटो काढण्याची एकही संधी सोडली नाही. यावेळी अनन्यानं ग्रे कलरचा टीशर्ट आणि ट्रॅक पॅण्ट घातली होती तर आदित्य रॉय कपूरनं ब्लॅक रंगाची पॅन्ट आणि टीशर्ट घातला होता. तर त्या दोघांच्याही हातात एक एक बॅग होती. यावेळी फोटोग्राफर्सनी त्यांचा फोटो काढायची एकही संधी सोडली नाही.
हेही वाचा - कंगनाच्या आलिया-रणबीरवरील टीकेला नीतू कपूर यांनी जश्यास तसं दिलं उत्तर
अनन्याचा नो-मेकअप लूक
यावेळी सुट्टीवरून परत येताना अनन्यानं आपला नो मेकअप लुक फॉलो केला होता. त्यामुळे तिच्यावर नाना तऱ्हेच्या कमेंट्स उठू लागल्या आहेत. यावेळी तिनं केस बांधले होते. त्यामुळे सगळे तिला सुचवतं होते की, ''अशाप्रकारे केस बांधून न ठेवता तुम्ही केस सोडा कारण तुम्ही तशाच छान दिसता'', अशी कमेंट एकानं केली आहे. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, ''अनन्या तुम्ही मेकअपशिवाय फार सुंदर दिसता?''
आदित्यवर का बरसले चाहते?
अनन्यासोबत आदित्य रॉय कपूर हा रिलेशनशिपमध्ये आहे असल्याचे कळताच चाहत्यांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ''तूला अनन्यापेक्षा कोणीतरी चांगली मिळायला हवी'', अशा काहींनी कमेंट्सही केल्या आहेत. तर एकानं म्हटलंय की, ''अशी काय मजबूरी आहे आदित्यची?'' तर अनेकांनी त्यांना त्यांची प्रायव्हसी मिळू देत अशी कमेंट केली आहे.