अदनान सामीच्या पहिल्या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध
गायक अदनान सामी राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित सिनेमा `अफगान- इन सर्च ऑफ ए होम` बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. अदनान सिनेमामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहे.त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.
मुंबई : गायक अदनान सामी राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित सिनेमा 'अफगान- इन सर्च ऑफ ए होम' बॉलिवूडमध्ये डेब्यू करत आहेत. अदनान सिनेमामध्ये संगीतकाराची भूमिका करणार आहे.त्याचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.
सिनेमाची कथा अफगानिस्तानच्या एका शरणार्थी संगीतकाराची आहे. तो त्याच्या मायदेशातून ओळख बनण्यासाठी निघाला आहे. अदनानाने या आधी अल्बममधून अनेक अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. 'तेरा चेहरा'मध्ये राणी मुखर्जी पासून भूमिका चावला पर्यंत अदनानने काम केलं आहे. पण आता तो सिनेमातून त्याच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.