मुंबई : काही दिवसांपूर्वी गायक अदनान सामी (Adnan Sami)ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. धक्क्यादायक बाब म्हणजे अदनानने सोशल मीडियावरील सर्व जुन्या पोस्ट डिलिट करत 'अलविदा' म्हणत एक व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला. त्यामुळे चाहत्यांच्या मनात चिंता होती. अखेर असं नक्की झालं तर काय आहे, ज्यामुळे अदनानने सोशल मीडियाच्या माध्यमातून 'अलविदा' म्हटलं आहे. गायक सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्यामुळे चाहत्यांनाही धक्का बसला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदनान त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांसोबत शेअर करतो. अदनान सामीची फॅन फॉलोइंग केवळ पाकिस्तानातच नाही तर भारतातही तगडी आहे. विशेषत: त्याने तिचे वजन कमी करून ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो शेअर केल्यामुळे त्याची फॅन फॉलोइंग पूर्वीपेक्षाही अधिक  वाढली आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, काही दिवस अदनान सामीच्या अकाऊंटवर  'अलविदा' म्हणत पोस्ट शेअर केली होती , पण त्याने आणखी एक नवीन पोस्ट शेअर केली आहे.  याचं अखेर समोर आली आहे. अदनानची ही पोस्ट फक्त प्रमोशनसाठी होती.


इतर अनेक सेलेब्सनीही त्यांच्या प्रोजेक्ट्सच्या प्रमोशनसाठी त्यांच्या इन्स्टा पोस्ट हटवल्या आहेत. त्यामुळे आता तुम्ही सुटकेचा नि:श्वास घेऊ शकता.  टीझर व्हिडीओमध्ये तुम्ही त्याला गाताना ऐकू शकता. अदनान सामी लवकरच नवीन गाणं रिलीज करणार आहे. त्यामुळे अदनानच्या नव्या गाण्याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.