मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको' वेगळ्या वळणावर आहे. सौमित्रचा अपघात झाल्यामुळे सगळेच चिंतेत आहेत. सौमित्र म्हणजे अभिनेता अद्वैत दादरकर. अद्वैत आपल्याला छोट्या पडद्यावर नव्या भूमिकेत दिसणार आहे. आतापर्यंत अद्वैतने दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता अशी भूमिका बजावली आहे. आता तो नव्या भूमिकेत दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या पिढीची आवड लक्षात घेऊन, अत्यंत उत्कृष्ट आणि दर्जेदार असे कार्यक्रम प्रेक्षकांना देत आहे. लवकरच 'युवा डान्सिंग क्वीन' हा एक नवीन बहारदार नृत्याचा कार्यक्रम झी युवा वाहिनीवर पहायला मिळणार आहे, ज्यामध्ये  नावाजलेल्या सेलेब्रिटींमध्ये मध्ये एक जंगी चुरस रंगेल.युवा डान्सिंग क्वीन हा अफाट सौंदर्य  आणि बेफाम नृत्य यांची एक अकल्पनीय सांगड असेल.या कार्यक्रमात सर्व  सेलिब्रिटी स्पर्धक लोकनृत्य आणि कंटेम्पररी डान्स यांचं फ्युजन सादर करतील. युवा डान्सिंग क्वीन मुळे आता ऐन थंडीत रंग चढणार , महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार.  


या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे या कार्यक्रमाचा सूत्र संचालक .गुणी नाट्यलेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून नाट्यवर्तुळात प्रसिद्ध असलेला अद्वैत दादरकर या हा युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन करणार आहे . लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून उत्तम कामगिरी बजावणारा अद्वैत हा आता ही सूत्रसंचालनची जबाबदारी कशी पार पाडेल याकडे प्रेक्षकांचं लक्ष असेल. तसेच या कार्यक्रमात कोण अभिनेत्री सहभागी होणार आहेत व परीक्षकांची भूमिका कोण बजावणार आहे, हे देखील प्रेक्षकांना लवकरच कळेल.