तालिबान्यांना चकवा देत पॉपस्टारने असा काढला पळ, सांगितला थरार
लोकप्रिय पॉप स्टार देश सोडण्यात यशस्वी झाली आहे.
मुंबई : अफगाणिस्तानची लोकप्रिय पॉप स्टार आर्यना सईद देश सोडण्यात यशस्वी झाली आहे. ती खूप भाग्यवान आहे की, तिला ही संधी मिळाली. अन्यथा, जर आर्यना सईद तालिबानच्या हाती सापडली असती तर, ते तिच्यासाठी खूप वाईट ठरलं असतं. आर्यना सईदने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तालिबानच्या तावडीतून सुटल्याची माहिती दिली आहे.
आर्यना सईदने तिच्या चाहत्यांना सांगितलं आहे की, तिची तब्येत चांगली आहे. तिने लिहिलं, 'काही भयानक रात्रींनंतर मी कतारला पोहोचले आहे आणि इस्तंबूलला माझ्या शेवटच्या फ्लाइटची वाट पाहत आहे.' काही वेळानंतर तिने असंही सांगितलं की, ती इस्तंबूलला रवाना झाली आहे.
अफगाण पॉपस्टारने असंही सांगितलं आहे की, तिच्याकडे देशाच्या भयानक स्थितीबद्दल अनेक अनुभव आहेत. ती तालिबानच्या तावडीतून सुटण्यात यशस्वी झाली. मात्र, आर्यना सईदच्या आई -वडीलांनी अफगाणिस्तान तेव्हाच सोडलं जेव्हा ती 8 वर्षांची होती. असं असलं तरी, सईद तिच्या देशात वारंवार यायची. तिचं कुटुंब लंडनला शिफ्ट झालं होतं.
जेव्हा तालिबानींने काबूलवर कब्जा केला तेव्हा पॉप स्टार तिथेच होती. आर्यना सईदला पकडण्यात ते यशस्वी झाले पाहिजेत असा तालिबानचा प्रयत्न असावा. जर असे घडलं असतं तर आर्यन सईदसोबत खूप वाईट झालं असतं. तालिबान्यांनी देशात ज्याप्रकारे कहर केला आहे, त्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, त्यांनी आर्यना सईदचं काय केलं असतं.
आर्यना सईद अफगाणिस्तानात खूप लोकप्रिय आहे. ती तिथल्या 'द व्हॉईस' या रिअॅलिटी शोची जज राहिली आहे. अमेरिकन कार्गो जेटमध्ये ती तुर्कीची राजधानी इस्तंबूलला रवाना झाली. तिने तिच्या इन्स्टाग्रामवरून फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.
आर्यना सईद सईद, अनेकदा बुरखा आणि हिजाबशिवाय दिसते, तिने 2014 मध्ये एका अमेरिकन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की, कट्टरपंथी नेत्यांनी तिला ठार मारण्याचा आदेश जारी केला होता.आर्यना सईदने दावा केला आहे की, जो तालिबानी तिला मारेल तो भाग्यवान असेल.