मुंबई :  अफगाणिस्तानात गेल्या काही दशकांतील सर्वात मोठी अनिश्चततेची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी अनेक देशांचे प्रयत्न सुरु आहेत. यातच अफगाणी चित्रपट निर्मातीने अंगावर काटा आणणारी पोस्ट शेअर केली आहे. तिने एक फोटो शेअर करत घरदार सोडताना होत असलेल्या वेदना सांगितल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणी चित्रपट निर्माती रोया हैदरी देश सोडून जात आहे. मात्र देश सोडत असताना तिने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.


रोया हैदरी यांनी सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आवाज उठवणं सुरु ठेवण्यासाठी मी माझं संपूर्ण आयुष्य, माझं घर सोडलं. पुन्हा एकदा, मी माझ्या मातृभूमीतून पळ काढत आहे. पुन्हा एकदा, मी शून्यापासून सुरुवात करणार आहे. मी फक्त माझा कॅमेरा आणि एक मृत आत्मा घेऊन समुद्रा पलिकडे निघाले आहे.



पुन्हा भेट होईपर्यंत हे मातृभूमी तुझा जड अंतःकरणाने निरोप घेते ' असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.  तिच्या या पोस्टकडे सर्वांनाच लक्ष केंद्रित झाले आहे.