'या' फोटोमुळे धनश्री आणि चहलचा घटस्फोट? फोटोतल्या तरुणाची Insta स्टोरी चर्चेत; म्हणाला, 'केवळ एका...'

Dhanashree Verma Yuzvendra Chahal Separation: धनश्री आणि या तरुणाचा फोटो सध्या तिचा चहलबरोबर घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच व्हायरल झाला आहे. फोटोतील या तरुणाने आपली बाजू मांडली आहे.

| Jan 09, 2025, 09:13 AM IST
1/14

pratikutekardhanashree

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्माच्या घटस्फोटासाठी हा फोटो जबाबदार ठरला का? फोटोतील तरुणाने काय म्हटलं आहे पाहूयात...

2/14

pratikutekardhanashree

भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी आणि प्रसिद्ध युट्यूबर धनश्री वर्मालाच्या कथित घटस्फोटामागे धनश्रीचा एका तरुणासोबतचा फोटो कारणीभूत असल्याचा दावा केला जातोय. 

3/14

pratikutekardhanashree

धनश्री आणि चहलचा घटस्फोट होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर या घटस्फोटासाठी हा तरुण आणि त्याच्यासोबतचा धनश्रीचा हा फोटोच कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे. 

4/14

pratikutekardhanashree

अनेकांनी या तरुणाचा आणि धनश्रीचा जुना फोटो शेअर करत त्याच्यावर निशाणा साधला आहे. असं असतानाच या तरुणानेही आपली बाजू मांडली आहे.

5/14

pratikutekardhanashree

ज्या तरुणाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे प्रतीक उतेकर! प्रतीक हा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे.

6/14

pratikutekardhanashree

प्रतीक उतेकरने आपण धनश्रीला डेट करत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या सर्व अफवा असल्याचं प्रतीकने म्हटलं आहे. प्रतीकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये धनश्रीबरोबर त्याचं नातं असल्याचा दावा करणाऱ्यांना त्याने झापलं आहे.

7/14

pratikutekardhanashree

धनश्री आणि आपल्यासंदर्भात जे काही दावे केले जात आहेत त्या अफवा असून केवळ एका व्हायरल फोटोच्या आधारावर कोणीही पूर्वग्रह दुषित करणारी विधानं करु नयेत असं प्रतीक म्हणाला आहे.

8/14

pratikutekardhanashree

"गोष्टी रंगून सांगण्यासाठी जगाकडे भरपूर वेळ आहे. केवळ पहिलेल्या एका फोटोवरुन कमेंट्स आणि डीएम केले जात आहेत. थोडं मोठे व्हा रे...", असं प्रतीकने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं आहे.

9/14

pratikutekardhanashree

धनश्री आणि चहलचा घटस्फोट होणार असल्याच्या शक्यतांच्या बातम्या समोर आल्यानंतर प्रतीक आणि धनश्रीचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत धनश्रीच्या पाठीमागे उभ्या असलेल्या प्रतीकने तिला आपल्या मिठीत पकडल्याचं दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला असून धनश्री प्रतीकला डेट कर करत नाही ना असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

10/14

pratikutekardhanashree

2024 साली मार्च महिन्यात समोर आलेला हा फोटो आता कथित घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान पुन्हा समोर आला आहे. धनश्री आणि चहलने एकमेकांना अनफॉलो केलं असून त्यांनी एकमेकांसोबतचे फोटोही काढून टाकल्याचं चाहत्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा आहेत. चहलने यानंतर एक सूचक स्टेटसही ठेवलं होतं.

11/14

pratikutekardhanashree

विशेष म्हणजे धनश्रीने 2022 साली आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'चहल' हे अडनाव काढून टाकलं होतं. त्यावेळीच या दोघांचा संसार वाटतो तितका छान सुरु नाही अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी चहलने इन्स्टाग्रामवर 'न्यू लाइफ लोडींग' म्हणजे नवीन आयुष्याला सुरुवात करत आहे, अशा अर्थाची स्टोरी ठेवली होती. या दोन्ही गोष्टी एकामागोमाग एक घडल्याने दोघांचा घटस्फोटाबद्दल चर्चा सुरु झाल्या.

12/14

pratikutekardhanashree

धनश्री वर्मा 2024 मध्ये ‘झलक दिखलाजा सीझन 11’च्या रिॲलिटी टेलिव्हिजन शोमध्ये झळकली होती. या स्पर्धेत ती टॉप-5 पर्यंत पोहोचली होती, परंतु तिला जेतेपदावर नाव कोरता आलं नव्हतं.

13/14

pratikutekardhanashree

‘झलक दिखलाजा सीझन 11’च्या स्पर्धेदरम्यान धनश्रीला अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. यामागचं कारण ठरला होता प्रतीक उतेकरबरोबरचा तिचा व्हायरल फोटो. या फोटोमुळे तिला अनेक द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला होता. तोच फोटो आता व्हायरल होतोय.

14/14

pratikutekardhanashree

धनश्री आणि चहलचं 2020 मध्ये गुरुग्राम येथे लग्न झालं. धनश्री ही मूळची मुंबईत स्थायिक असून ती एक टेंडिस्ट आहे.