सिनेमात फार काळ टिकला नाही आफताब शिवदसानी तरिही करोडोंची कमाई करतो अभिनेता
अफताबला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. पण त्याच्या इतर कामातून तो चांगला कमावतो.
मुंबई : अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया या सुपरहिट चित्रपटातून बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत दाखल झालेल्या आफताब शिवदासानी हे नाव फार कमी लोकांना माहिती असेल. आफताबला बॉलिवूडमध्ये फारसं यश मिळालं नाही. पण त्याच्या इतर कामातून तो चांगला कमावतो.
आफताब शिवदासानीने मस्त चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत उर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होती. आफताबचं नाणं चित्रपटांमध्ये अपेक्षेप्रमाणे चाललं नसलं तरी इतर क्षेत्रात तो खूप काही करत आहे.
आफताबची कमाई
आफताब शिवदासानीची गणना अशा कलाकारांमध्ये केली जाते ज्यांनी लहानपणापासूनच बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली. मात्र, चित्रपटसृष्टीत प्रदीर्घ इनिंग खेळूनही त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. असं असूनही कमाईच्या बाबतीत तो कमी नाही. भलेही तो चित्रपटांमधून फारशी कमाई करत नसला तरीही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो त्याच्या इव्हेंट्स आणि प्रोडक्शन हाऊसमधून वर्षाला सुमारे 3 कोटी रुपये कमावतो.
एका रिपोर्टनुसार, त्याची एकूण 51 कोटी रुपयांची मालमत्ता आहे आणि मुंबईत त्याचं एक अपार्टमेंटही आहे. आफताबला आपलं आयुष्य अगदी राजेशाही पद्धतीने जगायला आवडतं. यासोबतच त्याला लक्झरी कारचाही शौक आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये Audi RS 5 आणि BMW X6 सारख्या गाड्या आहेत.
पर्सनल लाइफ
आफताब शिवदासानीचं लग्न कबीर बेदीच्या पत्नीची बहिण निन दुसांजशी झालं आहे. त्याची पत्नी ब्रिटिश भारतीय असून लग्नापूर्वी ती मॉडेलिंग करत होती. आपल्या फिल्मी करिअरमध्ये तिने मस्त, आवारा पागल दीवाना, मस्ती, ग्रँड मस्ती आणि क्या कूल हैं हम यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलीकडेच, आफताब वेब सीरिज स्पेशल ऑप्स १.५ मध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.