तब्बल 25 दिवसानंतर घरी परतला तारक मेहता मधील `रोशन सोढी`, इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग?
Gurucharan Singh Returns Home : गुरुचरण सिंग सोढी अखेर 25 दिवसानंतर परतला घरी... इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग सोढी...
Gurucharan Singh Returns Home : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सोढी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. 22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाला होता. तर काल 17 मे रोजी तो परत आला आहे. काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर गुरुचरण हा स्वत: घरी परतला आहे. त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्यानंतर लगेच त्या संबंधीत तक्रार पोलिसात केली होती. दरम्यान, गुरुचरण सिंह सोढी हा आता परतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.
गुरुचरण सिंग सोढी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. इतकंच नाही तर ते त्याचा शोध देखील घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग सोढी हा घरी परतल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगितले की तो त्याचं सांसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासावर आहे. पोलिसांनी सांगितलं की गेल्या काही दिवसात तो अमृतसर आणि लुधियाना सारख्या शहरांमध्ये असलेल्या गुरुद्वारेत थांबला होता, पण नंतर त्याला या गोष्टीची जाणीव झाली की त्याला घरी परतायला हवे.
22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग सोढीला दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं येणारी फ्लाइट पकडायची होती. पण तो फ्लाइटमध्ये चढला नाही आणि बेपत्ता झाला. त्याचा फोन 24 एप्रिल पर्यंत चालू होता, त्याच्या मदतीनं त्यानं अनेक ठिकाणी पैशांची देवाण-घेवाण केली. पोलिसांच्या चौकशीत समोर आलं होतं की ज्या दिवशी गुरुचरण हा बेपत्ता झाला होता, त्या दिवसाच्या सीसीटिव्ही फुटेजमध्ये अभिनेता स्वत: त्याच्या पाठीवर एक बॅग घेऊन जाताना दिसतोय.
हेही वाचा : Heeramandi मधील रोमॅन्टिक गाण्यावर थिरकली गौतमी पाटील, VIDEO आला समोर
गुरुचरण सिंग सोढीचे वडील हरजीत सिंगनं 26 एप्रिलला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. , भारतीय दंड संहिता कलम 365 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आली होती. तपासादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, गुरुचण सिंगची आर्थिक स्थिती चांगली नाही कारण त्यांच्यावर अनेक कर्जे आणि थकबाकी होती. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या माहितीकडे लक्ष द्यायचे झाले तर तो सगळ्यात शेवटी दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या डाबडीमध्ये दिसला होता.