अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन, ऐश्वर्याच्या नावावर... मात्र आजही अपूर्ण...
Amitabh Bachchan : अभिषेक बच्चनच्या लग्नानंतर अमिताभ यांनी संपूर्ण कुटुंबाला दिलं होतं हे वचन आजही अपूर्णच
Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि त्यांचं कुटुंब हे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतं. कधी त्यांच्या कामाची चर्चा व्हायची तर आता त्यांच्या घरात फूट आल्याचं म्हटलं जात आहे. कोणत्याही घरात भांड्याला भांडं हे लागतं पण हे एक सेलिब्रिटी कुटुंब असल्यानं त्यांची सगळ्यात जास्त चर्चा रंगते. लग्नाच्या 17 वर्षांनंतर अभिषेत आणि ऐश्वर्यामध्ये वाद होत असल्याच्या चर्चा या चांगल्याच रंगल्या आहेत. तर बच्चन कुटुंब हे आता आता एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे त्यांनी एकदा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला एक असं वचन दिलं होतं जे आजवर पूर्ण झालं नाही... खरंतर 2008 मध्ये बिग बींनी त्यांचा पत्नी जया बच्चन, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या रायला उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्याच्या दौलतपुर गावात ऐश्वर्याच्या नावाचं एक कॉलेज सुरु करण्याचा विचार सगळ्यांसमोर मांडला होता.
अभिषेकच्या लग्नानंतर अमिताभ बच्चन यांनी एक वचन दिसं होतं. हे वचन त्यांनी पत्नी जया, मुलगा अभिषेक आणि सून ऐश्वर्या राय बच्चनला दिलं होतं. ऐश्वर्याच्या नावानं कॉलेज सुरु करणार असं वचन त्यांनी दिलं होतं. पण हे वचन पूर्ण करण्यास ते अपयशी ठरले. त्यांनी उत्तर प्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्याच्या दौलतपुर गावात ऐश्वर्याच्या नावाचं एक कॉलेज सुरु करण्याचं वचन दिलं होतं. पण जे काही झालं ते आश्चर्यचकीत करणारं होतं.
बच्चन कुटुंबानं ठरवलं की त्या कॉलेजचनं नाव 'ऐश्वर्या बच्चन कन्या महाविद्यालय' असं असेल. ही एक उच्च माध्यमिक शाळा असणार होती. याचाच अर्थ 9 ते 12 वी पर्यंतच्या मुली या शाळा आणि कॉलेजमध्ये शिकणार होते. जमिनीच्या व्यवहारापासून ते शाळा कशी असेल याचं प्लॅनिंग सगळ्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण एवढं सगळं करूनही शाळा हे स्वप्नच राहिलं.
हेही वाचा : ना बच्चन, ना खान, जर सगळं काही ठीक असतं तर ऐश्वर्या झाली असती 'या' कुटुंबाची सून
रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन यांनी हा प्रोजेक्ट निष्ठा फाउंडेशनला दिला होता. जो जया प्रदा या सांभाळत होत्या. आश्वासनाची पूर्तता पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या गावकऱ्यांनी देखील बांधकामासाठी 10,000 चौरस मीटरपेक्षा जास्त जागा देऊ केली. तरीही कॉलेज हे अधुरे स्वप्नच राहिले. जवळपास 10 वर्षे हे स्वप्न पूर्ण होत नाही हे पाहता 2018 मध्ये दौलतपूरच्या लोकांनी त्याची जबाबदारी घेतली आणि शाळेच्या जागी पदवी महाविद्यालयाची यशस्वी स्थापना केली.
हे पाहता गावकऱ्यांनी 500 मीटर अंतरावर असलेल्या एका पडीक जमिनीवर त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. यासाठी गावातील शिक्षक सत्यवान शुक्ला यांनी पुढकार घेतला. त्यावेळी सत्यवान हे 40 वर्षांचे होते. त्यांनी महाविद्यालयासाठी जवळपास 60 लाख रुपये जमवले. सत्यवान शुक्ला यांच्यां वडिलांनी आणि भावानं महाविद्यालयासाठी 10,000 चौरस मीटर जागा दान केली आणि दौलतपूर पदवी महाविद्यालय साकार झालं.
दरम्यान, अमिताभ बच्चन हे सध्या 'कौन बनेगा करोडपती 16 ' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांनी सोशल मीडियावर याविषयी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना माहिती दिली होती.