Akshya Kumar and Priyadarshan : तब्बल 14 वर्षांनंतर अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे. अभिनेता- दिग्दर्शकाची ही जोडी मोठ्या पडद्यावर आली की नक्कीच धम्माल करणार. त्याचं कारण म्हणजे या दोघांनी या आधी 'हेरा फेरी', 'भागम भाग' आणि 'गरम मसाला' सारखे चित्रपट केले आहेत. आता पुन्हा एकदा मोठ्या ब्रेकनंतर अक्षय आणि प्रियदर्शन एकत्र एका प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. यावेळी त्या दोघांसोबत एकता कपूर देखील एकत्र येणार असल्याचे म्हटले जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आणि प्रियदर्शन लवकरच या चित्रपटाचं काम सुरु करणार आहे. असं म्हटलं जातं की हा चित्रपट भारतातील खूप आधीच्या अंधविश्वास-जाडूवर आधारीत असणार आहे. एचटी सिटीला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शननं खुलासा केला की त्यांनी नुकतंच एका डॉक्यू-सीरिजचं काम संपवलं आहे. ही डॉक्यू-सीरिज राम मंदिराच्या इतिहासावर आधारीत आहे.


दरम्यान, प्रियदर्शननं अक्षयसोबत त्यांच्या आगामी चित्रपटाविषयी वक्तव्य केलं आहे. माझा सगळ्यात महत्त्वाचा चित्रपट ज्याच्यावर मी काम सुरु करणार आहे. तर अक्षयसोबत एकता कपूर या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट कॉमेडीसोबत एक भयानक अशा कल्पनेवर आधारीत आहे. त्यावरून त्यांना प्रश्न विचारण्यात आला की या चित्रपटाचा भूल भुलैयाशी काहीही संबंध असेल का? त्यावर उत्तर देत प्रियदर्शन पुढे म्हणाले की "तो एक सायकोलॉजितकल थ्रिलर चित्रपट होता, पण हा चित्रपट भारताच्या सगळ्या जुन्या अंधविश्वास, जादूवर आधारीत असलेला काल्पनिक चित्रपट असेल."


दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी अक्षय कुमारसोबत पुन्हा एकदा काम करण्यावरुण आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं की अक्षय कुमारसोबत काम करण्यावर आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या पहिल्या चित्रपटापासून त्यांचे आणि अक्षय कुमारचे चांगले संबंध आहेत. त्यांच्यामते अक्षय हा कोणत्या ही भावना चांगल्या प्रकारे समजतो.


हेही वाचा : झांझरिया... 28 वर्षांनंतर सुनील शेट्टी-करिश्मा कपूरने री-क्रिएट केला डान्स, वाळूवर रोमान्स


अक्षय कुमारच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच ‘स्काई फोर्स’, ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘हेरा फेरी 3’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय प्रभासच्या ‘कन्नप्पा’ या तेलगू चित्रपटात देखील दिसणार आहे. या चित्रपटातून तो तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. अक्षय कुमारची या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका असेल असं म्हटलं जातं.