मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान नेहमीच नेहमीच फॅन्समध्ये चर्चेत असतो. सध्या आमिर त्याच्या आगामी 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. दरम्यान, अभिनेत्याने महिन्याभरापूर्वी चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते, जेव्हा अचानक त्याने पत्नी किरण रावपासून घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. दुसरीकडे, आमिर खानचा भाऊ फैसल खान देखील त्याच्या 'फॅक्टरी' या कमबॅक चित्रपटाने चाहत्यांना पुन्हा भेटायला तयार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमिरचा भाऊ फैसल खान दिग्दर्शनाच्या जगात प्रवेश करणार आहे. अशा परिस्थितीत फॅक्टरी रिलीज होण्यापूर्वी फैसलने एका मुलाखतीत मोकळेपणाने काही गोष्टींचा खुलासा केला आहे, भाऊ आमीरच्या घटस्फोटापासून ते त्याने पुन्हा लग्न का केले नाही याबाबत त्यांने या मुलाखतीत सांगितलं आहे.


आमिरच्या भावाने पुन्हा लग्न का केले नाही?
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, फैसल खानने पुन्हा लग्न न करण्यावर म्हटले आहे की, माझ्याकडे बायकोला परवडण्या एवढे किंवा मैत्रिणीसोबत राहण्यासाठी अजून पुरेसे पैसे नाहीत, कारण आजकाल मैत्रीण असणे खूप महाग आहे. काही फरक पडत नाही. गर्लफ्रेंडचा खर्च बायकोपेक्षा महाग असतो. तो म्हणाला की जर माझा चित्रपट फॅक्टरी हिट झाला तर मी गर्लफ्रेंडबद्दल विचार करेन.



आमिर किरणच्या घटस्फोटामागचं कारण, भावाचा खुलासा


एवढेच नाही तर फैसलने आमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटाबद्दलही बोलले आहे, तो म्हणाला की, आमिर आणि किरणला मी कोणताही सल्ला देऊ शकत नाही, कारण माझे स्वतःचे लग्न चालु शकले नाही. तर दुसऱ्याच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करणारा मी कोण आहे? त्यांना माहित आहे की त्यांच्यासाठी काय चांगले आहे.


एवढेच नाही तर त्याने स्वत: आणि भाऊ आमिर यांच्या नातेसंबंधावर सांगितले की, दोन्ही भावांमध्येही सर्व काही ठीक चालले आहे. आता तो सर्व निर्णय स्वतः घेतो. मी एक दिग्दर्शक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे.