मुंबई : व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला मुंबई क्राइम ब्रांचने अटक केली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात पोलिसांनी राज कुंद्राला 23 जुलैपर्यंतची कोठडी सुनावली आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर सोशल मीडियावर त्याचेच पॉर्न संदर्भातील काही जुने ट्विट्स व्हायरल झाले आहेत. (After Arrest, Raj Kundra Old Tweets On Porn Vs Prostitution Go Viral) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वेश्याव्यवसाय आणि पॉर्नच्या कायदेशीरपणावर प्रश्न विचारणारे राज कुंद्रा यांचे जुने ट्विट सोशल मीडियावर पुन्हा चर्चेचा विषय बनले आहेत. २ मार्च २०१२ रोजीच्या ट्विटमध्ये राज कुंद्रा यांनी वेश्याव्यवसाय पोर्नपेक्षा वेगळे कसे आहे? असा प्रश्न विचारत एखाद्याला कॅमेर्‍यावर सेक्ससाठी पैसे देणे कायदेशीर आहे? असा सवाल केला आहे. 


पॉर्नवरील व्यावसायिकाचे विचार हायलाइट करणारे आणखी एक ट्विटही राज कुंद्राने आपल्या ट्विटरवर शेअर केले आहेत.  ट्विटरवर 3 मे २०१२ रोजी एक ट्विट केले होते. ते खूप व्हायरल झाले आहेत. 3 मे 2012 च्या ट्विटमध्ये रा कुंद्रा यांनी ट्विट केलं होतं. 'अभिनेता क्रिकेट खेळतोय, क्रिकेटर्स राजकीय होत आहेत. राजकीय व्यक्ती पॉर्न बघत आहेत. तर पॉर्न स्टार कलाकार होत आहेत.'





सुपर डान्सर जज आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) चे पती राज कुंद्रा (Raj Kundra) ला मुंबई पोलिसांनी 19 जुलै रोजी एडल्ट फिल्म बनवण्याच्या आरोपावरून अटक केली आहे. 23 जुलैपर्यंत राज कुंद्राला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे