मुंबई : खिलाडी अक्षय कुमारचा मुलगा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. लेखिका आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्याकडे संडे मॉर्निंग आवडण्याचे एक गोड कारण आहे. अक्षय कूमारसोबतचे फोटो बऱ्याचदा ट्विंकल आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करताना दिसते. पण नुकतीच तिने एका खास व्यक्तीचा फोटो शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर करत तिने आनंद व्यक्त केला आहे. ज्यात तिचा मुलगा आरव तिच्या कपाळावर किस करत आपलं प्रेम व्यक्त करत आहे.



मुलासोबत वेळ घालवण्याचा आनंद ट्विंकलने सांगितला आहे. चाहत्यांनी या माय-लेकाच्या जोडीला प्रचंड पसंती दिली आहे आणि त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.



पण ट्विंकलच्या या फोटोवर काहींनी आर्यन खानच्या ड्रग्स पार्टीचा संबंध जोडला आहे. आरव सुद्धा आर्यनच्या पार्टीत सामील होता अशी चर्चा रंगत होती. पण अखेर ट्विंकलच्या पोस्टनंतर या चर्चांना पुर्णविराम बसला आहे.