COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : साऊथ इंडस्ट्रीतील सिनेमांनी आजही आपला दबदबा कायम ठेवला आहे. बाहुबली सिनेमाने सर्व रेकॉर्ड्स तोडून नवा इतिहास निर्माण केला. 'बाहुबली' च्या जबरदस्त यशानंतर पुन्हा एकदा साऊथ इंडस्ट्रीशी संबंधित बातमी समोर येत आहे. महेश बाबूच्या आगामी 'भारत अने नेनु' सिनेमाचा टीझर रिलीज झाला असून हा सर्वाधिक पसंतीस आलेला टीझर आहे.  साऊथचा सुपरस्टार महेश बाबूचा सिनेमा 'भारत अने नेनु' चा टीझर रिलीज झाला. या टीझरने एक नवा रेकॉर्ड आपल्यानावे केला आहे.


सर्वाधिक लाईक्स 


हा टीझर जगातील दुसरा सर्वांच्या पसंतीस पडलेला टीझर बनला आहे. महेश बाबूने कित्येक सिनेमांचा या टीझरमुळे मागे टाकलय.  हा जगातील दूसरा सर्वात पसंत पडलेला टीझर असल्याचे एनालिस्ट रमेश बाला यांनी ट्विटवर सांगितले. याला साधारण ६.५ लाखाहून लाईक्स मिळाले आहेत.


'भारत अने नेनु' ची आतुरता 



टीझर पाहिल्यानंतर जगभरात सर्वांना 'भारत अने नेनु' सिनेमाची आतुरता लागली आहे. यामध्ये त्याचे कॅरेक्टर फार वेगळे असणार आहे. प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहेत. महेशबाबूची लोकप्रियता देशाबाहेरही खूप आहे.