एका रात्रीचं भाडं 29 लाख प्लस टॅक्स... भारतातील सर्वात महागडी हॉटेल्स

भारतातील महागड्या हॉटेल्सची यादी...

Sep 30, 2024, 22:25 PM IST

Expensive Hotels In India : हौसेला मोल नाही असं म्हणतात.  रॉयल फिल घ्यायचा असेल तर भारतातील या हॉटेलमध्ये राहून पाहा. भारतातील महागड्या हॉटेल्सची चर्चा जगभरात आहे. या हॉटेलमध्ये रहायचे असेल तर एका रात्रीसाठी तब्बल 29 लाख रुपये मोजावे लागतात.  

1/7

भारतात अनेक महागडे हॉटेल्स आहेत. येथे राहण्यासाठी एका रात्रीसाठी लाखो रुपये भाडं द्याव लागते. यापैकी एका हॉटेलमध्ये तर एका रात्रीसाठी तब्बल 29 लाख रुपये मोजवे लागतात. 

2/7

जयपुरमधील महाराजा पॅव्हेलियन, राज पॅलेस भारतातील सर्वात महागडे हॉटेल आहे. एका रात्रीसाठी  29 लाख रुपये मोजावे लागतात. 1727 मध्ये बांधलेला हा राज पॅलेस हे एक भव्य हेरिटेज हॉटेल आहे. राजस्थानची समृद्ध संस्कृतीचा वारसा दर्शवते. या हॉटेलमध्ये  खाजगी पूल, लायब्ररी, स्पा अशा नेक सुविधा मिळतात. येथे सोन्याच्या पानांच्या भिंती देखील आहेत. इथं राहताना शाही अनुभव येतो. ​

3/7

जोधपूर महाराणी स्वीट उम्मेद भवन पॅलेस याचा समावेश भारतातील महागड्या हॉटेल्सच्या यादीत होतो.  ​ महाराजा उमेद सिंग यांनी 1940 मध्ये हा महल बांधला होता.  महाराणी सूट हे एकेकाळी महाराणी बदन कानवन यांचे घर होते. हॉटेलच्या टेरेसवरुन मेहरानगड किल्ल्याचे सुंदर दृश्य  दिसते. येथे एका रात्रीचे भाडे 8.8 लाख रुपयांपर्यंत आहे.​

4/7

हैदराबादमधील निजाम सुट, ताज फलकनुमा पॅलेस हे देखील भारतातील महागड्या हॉटेलपैकी एक आहे. ताज फलकनुमा पॅलेस अतिशय भव्य आहे. येथे एका रात्रीचे भाडे 7.5 लाख रुपयांपर्यंत आहे.​  

5/7

उदयपूर मधील ताज लेक पॅलेस या हॉटलेचा भारतातील सर्वात महागड्या हॉटेलच्या यादीत दुसरा नंबर लागतो. या हॉटेलमधील संभू प्रकाश या सूटमध्ये राहण्यासाठी एका रात्रीसाठी 10 लाख रुपये एवढे पैसे मोजावे लागतात.  युरोपियन शैलीत डिझाइन केलेल्या सूटमधून तलावाचे अप्रतिम दृश्य दिसते.  

6/7

सर्वात महागडे हॉटेलच्या यादीत  नवी दिल्ली लीला पॅलेस केम्पिंस्की हॉटेलचा पाचवा क्रमांक लागतो. हे देशातील आलिशान हॉटेल्सपैकी एक आहे. एका रात्रीसाठी येथे कमाल 4.5 लाख रुपये एवढे भाडे द्यावे लागत आहे.    

7/7

जयपूर सुख निवास, रामबाग पॅलेस हे भारतातील महागडे हॉटेल आहे. एका रात्रीचे भाडे 10 लाख रुपयांपर्यंत आहे.​