मुंबई : सिनेनिर्माती-टेलिव्हिजन प्रोड्युसर एकता कपूर आई बनली आहे. सरोगसीद्वारे या बाळाचा जन्म २७ जानेवारी रोजी झाला. बाळाच्या जन्मानंतर सिनेविश्वातून एकतावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यानंतर एकताने तिच्या मुलाचे नाव रवी कपूर ठेवल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावरून तिने एक भावनिक पोस्ट शेअर करत मुलाचे नाव जाहीर केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकता कपूरने मुलाचे नाव वडील जितेंद्र यांच्या नावावरून ठेवले असल्याचे तिने सांगितले. रवी हे जितेंद्र कपूर यांचं खरं नाव आहे. परंतु चित्रपटांत नाही आपलं नाव बदलून जितेंद्र ठेवलं. एकताने सोशल मीडियावर 'देवाच्या कृपने मला करियरमध्ये मोठं यश मिळालं आहे. पण माझ्या आयुष्यात देवाने दिलेली भेट विशेष आहे. हा क्षण माझ्या संपूर्ण कुटुंबासाठी खास आहे. या जगात माझा मुलगा रवी कपूरसोबत मी माझ्या आयुष्यातील एका नवीन प्रवासाची सुरूवात' असल्याचं एकताने सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं आहे. एकताने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर करत डॉक्टरांचेही आभार मानले आहेत.



 



ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांनीही एकदाच्या मुलाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 'आधी मी 'दादा' झालो होतो आता 'नाना' झालो आहे. माझ्याजवळ आता लक्ष्य आणि रवी आहेत. माझ्या दोन्ही मुलांना मुलं झाली' असल्याचे सांगितलं. तुषार कपूरनेही आपल्या भाचाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे.


एकता कपूरआधी भाऊ तुषार कपूरही सरोगसीद्वारे पिता बनला आहे. त्याने मुलाचं नाव लक्ष ठेवलं आहे. निर्माता-दिग्दर्शक करण जौहरही सोरोगसीद्वारे दोन जुळ्या मुलांना पिता बनला आहे. करणने या दोन मुलांची नावं यश आणि रूही अशी ठेवली आहेत. बॉलिवूड किंग शाहरूख खानच्या मुलाचा अबरामचा जन्मही सरोगसीद्वारे झाला आहे.