मुंबई : 'बार बार देखो', 'अ जेंटलमॅन', आणि 'इत्तेफाक' असे लागोपाठ तीन सिनेमा फ्लॉप गेल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हताश झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्यासोबत करिअरला सुरूवात करणाऱ्या वरुण धवनने बॉलीवूडमध्ये आपली पकड मजबूत केली आहे.


अकाऊंट्सला ब्लॅकआऊट


सिद्धार्थ मल्होत्रा सध्या 'अय्यारी' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत मनोज वाजपेयीदेखील या सिनेमात दिसणार आहे.


पण दरम्यान त्याने सर्व अकाऊंट्सला ब्लॅकआऊट का केले याचे उत्तर मिळत नाहीए.


आपल्या सिनेमामूळे सिद्धार्थ ट्रोल झाला आहे. 'अ जेंटलमॅन' रिलीजवेळीही तो असाच ट्रोल झाला. हरियाणा तापले होते आणि सिद्धार्थ आपला सिनेमा पाहण्यासाठी आवाहन केले होते. 


"सॉरी, मी थकलोय !"


"सॉरी, मी थकलोय !" असे सिद्धार्थने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे. त्याचसोबत त्याने आपले अकाऊंट ब्लॅकआऊटदेखील केले आहे.



असेच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरही केले आहे.  यामागचे कोणते कारण अद्याप समोर आले नाहीए.