Natasa Stankovic In Love After Divorce : भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टेनकोविक हे जुलै 2024 मध्ये विभक्त झाले. त्यांनी मर्जीनं घटस्फोट घेतल्याचे त्यांनी सांगितलं. घटस्फोटानंतर नताशा मुलगा अगस्त्यसोबत सर्बियाला निघाली. माहेरी पोहोचल्यानंतर नताशा सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसली. आता या सगळ्या पोस्टमध्ये नताशाची एक नवी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नताशानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली आहे. या सेल्फीमध्ये ती गाडीनं प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर खिडकीच्या बाहेर दिसत असलेल्या सुंदर निळ्या आकाशाकडे नताशा पाहत आहे. हे फोटो शेअर करत नताशानं कॅप्शन लिहिलं की 'देव दिशा दाखवत आहे, माझ्या आजुबाजूला फक्त प्रेम आहे... कृतज्ञतेत मी जगते आहे. आनंदाचा अनुभव करत आहे.'



हार्दिक पांड्या आणि नताशाची भेट ही 2019 मध्ये झाली. एकवर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी मे 2020 मध्ये लग्न केलं. दोघांनी या आधी कोविड काळात लग्न केलं होतं त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा फेब्रुवारी 2023 लग्न केलं. यावेळी त्यांनी हिंदू-ख्रिश्चन धर्मांच्या परंपरेनुसार लग्न केलं. या दोघांचा मुलगा अगस्त्यला त्यांचं लग्न पाहायचं होतं त्यासाठी त्यांनी दुसरं लग्न केल्याचे म्हटले जात होतं. खरंतर त्यांचं नात हे जास्त काळ टिकलं नाही जुलै 2024 मध्ये दोघांनी विभक्त होत असल्याची बातमी दिली. त्यांचं काळ जास्त काळ टिकून राहिलं नसलं तरी देखील ते एकत्र येऊन त्यांच्या मुलाचा सांभाळ करणार आहेत. 


हेही वाचा : तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'


जेव्हा हार्दिक आणि नताशानं त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा त्यांच्या चाहत्यांना आश्चर्य झालं. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिलं की '4 वर्ष एकत्र राहिल्यानंतर नताशा आणि मी एकत्र विचार करून हा निर्णय घेतला आहे की आम्ही वेगळं व्हावं. आम्ही दोघांनी एकत्र खूप प्रयत्न केले आणि या नात्याला सगळं काही दिलं. आमचं म्हणणं आहे की हा आमच्यासाठी असलेला योग्य निर्णय आहे. आमच्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. तो आनंद, एकमेकांविषयी असलेला सन्मान आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींचा आम्ही आनंद घेतला. आम्ही मिळून अगस्त्यचा सांभाळ करू. आम्ही त्याला ते सगळं देण्याचा प्रयत्न करू जे आम्ही देऊ शकतो.'