तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...'

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : तैमूर आणि जेहची पेडियाट्रिक नर्सच्या पगाराची चर्चा रंगली...

दिक्षा पाटील | Updated: Aug 9, 2024, 12:53 PM IST
तैमूरच्या पेडियाट्रिक नर्सच्या आणि पंतप्रधानांच्या पगाराची तुलना! म्हणाली, 'माझा अधिकार...' title=
(Photo Credit : Social Media)

Taimur and Jeh's Pediatric Nurse Salary : बॉलिवूड अभिनेत्री करीन कपूर आणि सैफ अली खान यांचं संपूर्ण कुटुंब हे नेहमीच चर्चेत असतं. त्यापेक्षा सगळ्यात जास्त चर्चा असते ती त्यांच्या मुलांची अर्थात तैमूर आणि जेहची... त्यात आता चर्चा आहे तैमूर आणि जेहची पॅडियॅट्रिक नर्सची... तेव्हा पासून त्या नर्सच्या पगाराची चर्चा रंगली होती. इतकंच नाही तर तिच्या पगाराची तुलना ही भारताचे पंतप्रधानांच्या पगाराशी देखील करण्यात आली होती. 

ललिता डिसिल्वाला आता सगळेच स्टारकिड्सची तैमूर अली खान आणि जेह अली खान नॅनी म्हणून ओळखतात. खरंतर ललिता यांना नॅनी म्हणणं देखील त्यांना पसंत नाही. त्यांनी नॅनी म्हणण्यावर नाराजगी व्यक्त केली होती. तर आता जी मुलाखत व्हायरल होते ती नॅनीची नाही तर पेडियाट्रिक नर्सची आहे. ही नर्स तैमूरच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवते. जेव्हा हे सोशल मीडियावर व्हायरल होता, तेव्हा सगळे नेटकरी त्यांच्या पगाराची तुलना ही पंतप्रधान यांच्या पगाराशी करत होते. 

ललिता डिसिल्वानं सांगितलं की श्रीमंत घरांमध्ये नॅनी आणि पेडियाट्रिक नर्स वेगवेगळ्या कामांसाठी असतातय त्या एक नर्स आहेत. ज्या तैमूरच्या जन्मापासून पतौडी कुटुंबाशी जोडलेल्या आहेत. त्या जेव्हापासून तैमूरसोबत स्पॉट झाल्या, तेव्हा पासून त्यांच्या पगारांच्या अफवाह सुरु झाल्या. ललिता या गेल्या 8 वर्षांपासून तैमूर आणि जेहच्या पॅडियाट्रिक नर्स होत्या. त्यांनी आधी देखील अनेक सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. त्यामुळेच त्यांच्या पगारावरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. 

ललिता यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'तैमूरच्या वेळी त्यांच्या पगाराची तुलना ही पगाराशी व्हायची. माझे नातेवाई बोलतात ललिता तुला पंतप्रधानांपेक्षा जास्त पैसे मिळतात. मी म्हणायचे असे झालं असतं तर बरं झालं असतं.' 

ललिता यांनी पुढे सांगितलं की कॉर्पोरेट एक्झिक्यूटिव्हला सुद्धा एक ठरावीक तासांसाठी नोकरी असते. पण नर्स म्हणून 24 तास काम करते आणि त्यांना कोणत्याही प्रकारची सुट्टी मिळत नाही. त्यामुळे तिनं जास्त पगार मागणं योग्य आहे. 

हेही वाचा : रणबीरच्या Animal चित्रपटातील 'तो' डिलीटेड सीन VIRAL! नेटकरी म्हणाले, 'दिग्दर्शकाला माफ करणार नाही'

पुढे ललिता म्हणाल्या, 'माझा प्रश्न हा आहे की मी 24 तास काम करे. त्यात सुट्टी नसते. कोणताही कॉर्पोरेटमध्ये काम करणारा माणूस हा 9 ते 5 अशी नोकरी करतो. त्यांना वीकेंडला सुट्टी मिळते. फॅमिली वेकेशन मिळतं. मला काय मिळतं? जेव्हा दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात. तेव्हा आम्ही देशाच्या बाहेर असतो. त्यामुळे मला जास्त पगार घेण्याचा अधिकार आहे.'