VIDEO : हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो...गाण्याला टक्कर देणारं Potato Song
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
मुंबई : हल्ली सोशल मीडियावर नवनव्या गोष्टी पाहायला मिळतात. इंटरनेटवर काय, कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर, हॅलो फ्रेंड्स, चाय पिलो... ही बाई सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र आता या व्हिडिओला टक्कर देणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
टक्कर देणारा हा व्हिडिओ लॉरा क्लेरी नावाची गायिका असून 'पोटॅटो साँग' घेऊन आली आहे. हो तुम्ही खरं ऐकलंय. हे गाणं 'बटाटा' या खाद्यपदार्थावर अवलंबून आहे. बॉलिवूडमध्ये 'समोसा में आलू' यासारखी अनेक गाणी आहेत. मात्र हे गाणं हटके आहे. या परदेशी सिंगरला पाहताना तुम्हाला देसी रॉकस्टार गर्ल ढिंचॅक पूजाची आठवण येते. या गाण्यात ही सिंगर आपलं फेव्हरेट फूड बटाटा घेऊन आहे.