मुंबई : अभिनेता इरफान खान यांच निधन लॉकडाऊनच्या काळात निधन झालं. कर्करोगामुळे इरफान खान यांच निधन झालं. छोटा पडदा, बॉलिवूड आणि नंतर हॉलिवूडमध्येही आपली वेगळी ओळख इरफान खान यांनी निर्माण केली होती. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. लॉकडाऊनमुळे इरफान खान यांचे अखेरचे दर्शन देखील घेणं या कलाकारांना शक्य झालं नाही. तेव्हा अनेकांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड ते अगदी राजकीय वर्तुळातील व्यक्तींनी इरफान खान यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शर्लिन चोप्राने ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे. 



मिर्झापुरमधील अभिनेत्री अनंग्शा बिस्वावने देखील आपल्या भावना इंस्टाग्रामवर शेअर केल्या आहेत. 'हे खूप मोठ नुकसान आहे. मी तुमच्याकडून बरंच काही शिकले. पण प्रत्यक्षात तुम्हाला भेटण्याची संधी कधी मिळाली नाही.'



इरफान खान यांनी मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. खूप काळापासून इरफान खान यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र काही दिवसांपूर्वी तब्बेत बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमधून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना Colon infection झालं होतं. त्यानंतर सुजीत सरकार यांनी इरफान आपल्यासोबत नसल्याची माहिती दिली होती.