मुंबई : अभिनेत्री मौनी रॉय मोठ्या ब्रेकनंतर पुन्हा टीव्हीवर परतली आहे. मौनी रॉयची डान्स इंडिया डान्स लिल मास्टर सीजन 5 मध्ये परिक्षक म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, अभिनेत्रीने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून सगळ्यांचं लक्षवेधलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लता मंगेशकर यांच्या 'पिया तोसे नैना लागे रे' गाण्यावर मौनी रॉय डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावर आपल्या डोळ्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या मौनी रॉयचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर आगीसारखा पसरत आहे.


या ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने एम्ब्रॉयडरी असलेला काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. या सूटसह, हातात बांगड्या आणि कानात मोठे झुमके मौनी रॉयच्या लूकमध्ये भर घालत आहेत.


चेहऱ्यावर येणारे लांबसडक केस आणि तिचे डोळे, मादक अदा चाहत्यांचं लक्षवेधून घेत आहेत. मौनी रॉयचा हा व्हिडीओ पाहून तिचे चाहते सोशल मीडियावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


लग्नानंतर मौनी रॉयचा समोर आलेला हा व्हिडिओ तिने नवऱ्याला डिडेकेट केल्याचं ही बोललं जात आहे. विवाहगाठ बांधल्यानंतर पहिल्यांदाच मौनी पारंपारिक अंदाजात जुन्या हिट गाण्यावर अदाकरी करताना दिसली आहे. तिच्या अदा पाहून सगळेच मौनी रॉयमध्ये आता मोठा फरक झाल्याचं बोलत आहेत.