लग्नानंतर Rajkummar Rao ची पत्नी नाईटीमध्ये दिसली एअरपोर्टवर?
अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नानंतर मुंबईत परतले आहेत.
मुंबई : अभिनेता राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नानंतर मुंबईत परतले आहेत. मुंबई विमानतळावर, कलाकारांनी मीडियासाठी पोज देताना फोटो क्लिक केले आहेत. नवविवाहित जोडप्याने रोमँटिक पोज दिल्या आहेत.
या फोटोत राजकुमार राव आणि पत्रलेखा एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून फोटो क्लिक करत आहेत. राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी 15 नोव्हेंबर रोजी चंदीगडमध्ये सात फेरे घेतले. राजकुमार राव-पत्रलेखा 11 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
लग्नानंतर मुंबईत परतलेल्या या कपलचा हटके लुक एअरपोर्टवर दिसून आला. राजकुमार रावने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा तर पत्रलेखाने लाल रंगाची डिझाईनर साडी घातली आहे. पण राजकुमारच्या नव्या नवरीचा हा साडीचा पॅटर्न पाहता तिला ट्रोल देखील करण्यात आलं आहे.
पत्रलेखाची साडी ही नाईट ड्रेसच्या पॅटर्न प्रमाणे दिसत असल्याने तिला चाहत्यांनी ट्रोल केला आहे.
राजकुमार राव आणि पत्रलेखा, मुंबई विमानतळावर हात धरून एकत्र बाहेर पडताना पापाराझींनी त्यांचे फोटो क्लिक केले. हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.