मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये बंद आहे. २ ऑक्टोबरला अटक केल्यानंतर आर्यनला ७ ऑक्टोबरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 8 ऑक्टोबरला गौरी खानचा वाढदिवस होता. तिच्या वाढदिवसानिमित्त लाडका आर्यन सोबत असेल अशी अपेक्षा होती पण तसं झालं नाही. दुसरीकडे, सोमवारी शाहरुख आणि गौरीच्या लग्नाचा 30 वा वाढदिवस आहे. मात्र पुन्हा एकदा आर्यन आपल्या आई-वडिलांसोबत हा आनंद साजरा करण्यासाठी उपस्थित नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आर्यन तुरुंगात रडत होता आणि तुरुंग प्रशासनाला पालकांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले जेणेकरुन तो त्यांना पाहू शकेल.


शाहरूख - गौरीच्या लग्नाचा वाढदिवसाला उपस्थित नव्हता आर्यन 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अलीकडेच गौरी खान तिचा मुलगा आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये पोहोचली. आर्यन खान गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ बंद आहे. याआधी शाहरुख खानही आर्यनला भेटण्यासाठी जेलमध्ये पोहोचला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर शाहरुख गुरुवारी आर्यनला पोहोचला होता. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र सरकारने कैद्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी कोरोना महामारीमुळे बंदी होती.


तुरुंगात असलेल्या आर्यन खानबद्दलचा प्रत्येक तपशील रोजच समोर येत आहे. तुरुंगात राहणाऱ्या काही कैद्यांनी सांगितले की, आर्यन रोज रडतो. आर्यनचे काहीही न खाणे आणि वॉशरूममध्ये न जाणे यामुळे कर्मचारी आर्यनच्या तब्येतीची आणि स्वच्छतेची काळजी घेत असल्याचेही बातमी आहे. आर्यनला जेलमधील जेवण आवडत नाही त्यामुळे तो बिस्किटांनी पोट भरत असल्याचेही सांगण्यात आले.


आर्यन खानला 'स्टार' किड म्हणून कोणतीही विशेष सुविधा देण्यात आलेली नाही, असे यापूर्वी सांगण्यात आले आहे. आर्यनला जेलमध्ये तेथील नियम आणि कायदे पाळावे लागतात जे इतर कैद्यांसाठी बनवले गेले आहेत. त्यालाही इतर कैद्यांप्रमाणे जेवण दिले जात आहे पण आर्यन जेवत नाही. मात्र, त्याला कॅन्टीनमधून काही खायचे असेल तर तो पैसे देऊन खरेदी करू शकतो, त्यासाठी कुटुंबातील सदस्य 4500 ची मनीऑर्डर पाठवू शकतात. नुकतेच शाहरुखने त्याला 4500 रुपये पाठवले.