Pushpa आणि KGF 2 नंतर प्रेक्षकांसाठी साऊथ इंड्रस्ट्रीचा `हा` कडक सिनेमा
साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या `KGF`, `KGF 2`, `777 Charlie`, `Vikrant Rona` आणि Pushpa या सुपरहिट चित्रपटानंतर प्रेक्षकाचं भेटीला आणखी एक चित्रपट येतोय.
मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या 'KGF', 'KGF 2', '777 Charlie', 'Vikrant Rona' आणि Pushpa या सुपरहिट चित्रपटानंतर प्रेक्षकाचं भेटीला आणखी एक चित्रपट येतोय. बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवायला सज्ज असलेला चित्रपट 'Kabzaa'. या सिनेमाचं दिग्दर्शन आर चंद्रू यांनी केलं असून या चित्रपटात उपेंद्र राव, कीचा सुपीर, मुरली शर्मा आणि नवाब शाह दग्गुबती यांसारख्या दिग्गज कलाकारांचा अभिनय पाहायला मिळणार आहे.
तब्बल सात भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 'कब्जा' या चित्रपटाचा टीजर रिलीज केला आहे. 1947 ते 1984 या कालखंडावर आधारित असलेल्या 'कब्जा' चित्रपटाची कथा भारतातील गुंडांचा उदय आणि वर्चस्व यांसदर्भात आहे. स्वातंत्र्यलढ्यात मोलाचं योगदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा माफियांच्या जाळ्यात कसा अडकतो, हे या चित्रपटाच्या कथेत दाखवण्यात आलं आहे.
या सिनेमाचा दिग्दर्शक आर चंद्रू याने असं म्हटलं आहे. 'आम्हाला टीझरच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण करायची आहे. 18 सप्टेंबरला उपेंद्रचा वाढदिवस आहे, यामुळे आम्ही विचार केला की त्याच्या चाहत्यांना एक मौल्यवान भेट द्यायला हवी. म्हणूनच, आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे. 'कब्जा' हा चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, ओरिया आणि मराठी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.