राज कुंद्रानंतर बॉलिवूडच्या आणखी एका निर्मात्यावर लैंगिक छळाचा आरोप
पॉर्न फिल्म्स बनवल्याप्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूड एडल्ट कंन्टेट संदर्भात बरीच चर्चेत आहे.
मुंबई : मुंबई पोलिसांनी बॉलिवूड चित्रपट निर्माता विभू अग्रवाल यांच्या विरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेच्या तक्रारीवरून विभूविरोधात कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विभू व्यतिरिक्त, त्यांच्या कंपनीतील अंजली रैना यांनाही आरोपी बनवण्यात आले आहे. या दोघांविरुद्ध 4 ऑगस्ट रोजी आंबोली पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
28 वर्षीय पीडितेचा आरोप आहे की, विभूच्या कंपनी उल्लू डिजिटलच्या कार्यालयातील स्टोअर रूममध्ये तिचा विनयभंग करण्यात आला.
विभू अग्रवाल यांची चित्रपट निर्मिती कंपनी उल्लू डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड एडल्ट कंटेंट तयार करते. तथापि, काही दिवसांपूर्वी, एका मुलाखतीदरम्यान, विभू अग्रवाल यांनी उल्लू व्यासपीठाची सामग्री कौटुंबिक सामग्रीमध्ये बदलण्याविषयी सांगितलं होते. 2013 मध्ये विभू अग्रवालने बात बन गई हा चित्रपट तयार केला. त्यांनी 2018 मध्ये उल्लू अॅप लाँच केले. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, या अॅपवर भोजपुरी, बंगाली, पंजाबी, मराठी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि गुजराती भाषेत एडल्ट कंटेंट प्रदान केली जाते.
बॉलिवूडमध्ये पॉर्नोग्राफीबद्दल बरीच चर्चा
पॉर्न फिल्म्स बनवल्याप्रकरणी राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूड एडल्ट कंन्टेट संदर्भात बरीच चर्चेत आहे. राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती. तो सध्या मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. कुंद्राच्या बेकायदेशीर पैशांचाही पोलीस तपास करत आहेत. ईडीच्या मागणीवरून मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपशीलही शेअर केला आहे. कुंद्रावर अश्लील सिनेमे बनवून ते ऑनलाईन विकल्याचा आरोप आहे.