मुंबई : बॉक्सऑफिसवर १० जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला बॉलिवूड अभिनेता अजय देवगन स्टारर 'तानाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळतेय. बॉक्सऑफिसवर चित्रपटाने जवळपास ३४.५० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटला मिळत असलेल्या यशानंतर अजय देवगनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेक्षकांच्या उत्तम प्रतिक्रियांमुळे अजय देवगन खुश असल्याचं दिसतंय. ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत अजयने चाहत्यांचे आभार मानले आहेत. व्हिडिओमध्ये त्याने अधिकाधिक भारतीयांनी हा चित्रपट पाहावा आणि संपूर्ण जगाला तानाजीची वीरगाथा सांगावी असं म्हटलंय. 



चित्रपट प्रदर्शनानंतर अजयने जेएनयूत झालेल्या हिंसेबाबतही आपली प्रतिक्रिया दिली होती. अजयने ट्विट करत, सर्वांनी शांती आणि बंधुभावाची भावना जोपासण्याचं आवाहन केलं होतं. 



'बॉक्सऑफिस इंडिया'नुसार, 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ने ओपनिंग डेलाच जवळपास १५.१० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी हा 'तानाजी...'ने जवळपास २०.५७ कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच बॉक्सऑफिसवर 'तानाजी...'ने दोन दिवसांत जवळपास ३५.६७ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. 


'तानाजी: द अनसंग वॉरियर' सत्य घटनेवर आधारित आहेत. चित्रपटात तानाजी मालुसरे यांची वीरगाथा दाखवण्यात आली आहे. ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगनशिवाय सैफ अली खान, शरद केळकर, काजोल, नेहा शर्मा, पद्मावती राव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.