मुंबई : बॉलिवूडची सर्वात बोल्ड अभिनेत्री मलायका अरोरा खान सध्या अर्जुन कपूरसोबतच्या तिच्या लव्ह लाईफमुळे खूप चर्चेत आहे. दोघेही अनेक पार्ट्यांना एकत्र हजेरी लावताना दिसतात. दोघांचे रोमॅन्टिक फोटो देखील व्हायरल होत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात आता मलायका अरोराचा एक्स हसबँड अरबाज खानसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई विमानतळावरील आहे.


 



वास्तविक मलायका अरोरा आणि अरबाज खानचा मुलगा अरहान खान उच्च शिक्षणासाठी काही महिन्यांपूर्वी परदेशात गेला होता आणि आता अरहान खानला सुट्टी आहे, त्यामुळे 10 डिसेंबर रोजी मुंबईत परतला असून त्याचे स्वागत करण्यात आले आहे. यासाठी मलायका अरोरा आणि अरबाज खानसोबत मुंबई विमानतळावर पोहोचले होते.



अनेक महिन्यांनंतर मुलगा अरहानला समोर पाहून मलायका अरोरा आणि अरबाज खान या दोघांच्याही आनंद गगनात मावेनासा झाला होता.



मलायका आणि अरबाज या दोघांनीही आपला मुलगा अरहानला मिठी मारून त्याचे स्वागत केले आणि त्यादरम्यान मलायका अरोरा भावूक झाली. मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचा मुलगा अरहान खान उच्च शिक्षणासाठी गेल्या काही महिन्यांपासून परदेशात राहत होता.



अरहान खानने ऑगस्टमध्ये परदेशात गेला होता. मलायका अरोरा आपला मुलगा अरहान खानची आठवण करून देत असते आणि सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित पोस्ट शेअर करत असते आणि ती आपला मुलगा अरहानला किती मिस करते हे देखील सांगताना दिसते.