Dhanashree Kadgaonkar New Home : काही दिवसांपूर्वीपासून एकामागे एक मराठी कलाकार हे त्यांचं घर घेताना दिसत आहेत. त्यात हास्यजत्रेतील प्राजक्ता माळी आहे. तिनं काही दिवसांपूर्वी फार्महाऊस खरेदी केलं. तर त्याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरनं मुंबईत तिचं हक्काचं घर खरेदी केलं. त्याशिवाय हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकरनं देखील नवं घर खरेदी केलं. आता आणखी एक मराठमोळ्या अभिनेत्रीनं मुंबईत घर घेतलं आहे. तुझ्यात जीव रंगला मालिका फेम अभिनेत्री धनश्री काडगांवकरनं मुंबईत हक्काचं घर खरेदी केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धनश्रीनं तिनं नवं घर घेतल्याची गोड बातमी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धनश्रीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. धनश्रीनं एक फोटो आणि एक व्हिडीओ अशा दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. धनश्रीनं फोटो शेअर केला असून त्याला , नवीन घर...स्वप्न खरी होतात असं कॅप्शन तिनं दिलं आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं व्हिडीओ शेअर केला असून त्याला होम स्वीट होम... जिथे प्रेम आणि आनंद एकत्र असतात. 



धनश्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून त्यावर तिच्या चाहत्यांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'हार्दिक अभिनंदन दादा आणि वहिनी.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'आपल्या संपूर्ण मालिका बघत असतो.... खुप छान अभिनय करतात....अशी च प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहु द्या..‌.' तिसरा नेटकरी म्हणाला की 'स्वप्न बघितली तरच ती पुर्ण ही होतात...' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'स्वप्न नक्कीच बघायला हवी...'  दुसरा नेटकरी म्हणाला 'खूप खूप शुभेच्छा.' एका दोघांनी नाही तर अनेक लोकांनी कमेंट करत धनश्रीला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


धनश्रीनं तिच्या युट्यूब अकाऊंटवरून या सगळ्या प्रोसेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिनं घराचा ताबा मिळेपर्यंतच्या सगळ्या गोष्टी दाखवल्या आहेत. त्याशिवाय, तिनं या व्हिडीओत संपूर्ण घर दाखवलं असून इंटेरिअरविषयी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 


हेही वाचा : Animal Teaser : 'हम ने क्रिमिनल पैदा किया हैं' कधीच पाहिला नसेल रणबीरचा असा अवतार!


धनश्रीविषयी बोलायचे झाले तर तिला कामासाठी धनश्रीला पुण्याहून मुंबईत शिफ्ट व्हावं लागलं होतं. अचानक मुंबईत शिफ्ट होणं तिच्यासाठी सोप नव्हतं. मुलगा दोन वर्षाचा असल्यानं सुरुवातीला ती एकटीच मुंबईत शिफ्ट झाली. त्यामुळे ती मुंबई-पुणे हा प्रवास करत होती. आता स्वत: चं घर घेतल्यानं तिचा हा प्रवास नक्कीच थांबेल.