Kartik Aaryan and Tara Sutaria Dating : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा अभिनेता कार्तिक आर्यन हा लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करतो. काल 22 नोव्हेंबर रोजी कार्तिक आर्यननं त्याचा 33 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्तानं त्यानं त्याच्या मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत काही ओळखीचे तर काही अनओळखी चेहरे दिसले. पण या सगळ्यात कोणी सगळ्यांचे लक्ष वेधले असेल तर ती अभिनेत्री तारा सुतारिया आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टीतील कार्तिक आर्यनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. अनेक सेलिब्रिटींसोबत कार्तिक आर्यन यावेळी दिसला. त्या पार्टीतील अनेक फोटो देखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले. व्हायरल झालेल्या फोटोत कार्तिक आर्यनचा त्याच सह-कलाकार तारा सुतारियासोबतचा फोटो देखील होता. कार्तिकच्या वाढदिवसानिमित्तानं तारानं सेटवरील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. तो फोटो पाहिल्यानंतर त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असल्याचे कमेंट सेक्शनमध्ये दिसून आले. दोघांना एकत्र पाहिल्यानंतर त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या.  



या व्हायरल झालेल्या फोटोत वाणी कपूर, दिग्दर्शक अभिषेक कपूर, रवीना टंडनची लेक राशा थडानी देखील यावेळी या पार्टीत दिसली. तारा सुतारीयाला या पार्टीत पाहिल्यानंतर पुन्हा एकदा कार्तिक आर्यनच्या आणि ताराच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली. खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा या सुरुच होत्या. त्यात तारानं कार्तिकसोबतचा शेअर केलेला फोटो आणि त्याच्या पार्टीत हजेरी लावली. या पार्टीत उपस्थित असलेल्या सगळ्या सेलिब्रिटींनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. त्यामुळे या पार्टीची थिम ब्लॅक होती हे स्पष्ट झालं आहे.  तारानं कार्तिकसोबतचा फोटो शेअर करत कॅप्शन दिलं की, 'पोपट तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!' 




दरम्यान, कार्तिक आणि तारा हे दोघे लवकरच 'आशिकी 3' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. मात्र, याविषयी अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसून त्या चित्रपटासाठी नक्की कोणाला कास्ट करण्यात आलं आहे हे स्पष्ट झालेलं नाही. याशिवाय त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना ना दुजोरा दिला आहे नाही नकार. या आधी कार्तिक आर्यनचं नाव हे सारा अली खान आणि अनन्या पांडे यांच्यासोबत जोडण्यात आलं होतं. 


हेही वाचा : KBC 15 : एका चुकीच्या उत्तराची किंमत 97 लाख! तुम्हाला माहिती आहे का या 1 कोटींच्या प्रश्नाचं उत्तर?


कार्तिकच्या वाढदिवसानिमित्तानं करणनं त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली. पुन्हा एकदा करण जोहर आणि कार्तिक आर्यन एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.