मुंबई : बॉलिवूडमध्ये कधी कोणाचे नाव कोणासोबत जुळेल हे सांगता नाही. त्याप्रमाणे प्रेमविरह, सोडचिठ्ठी अशा अनेक चर्चा सेलेब्रिटींमध्ये कायम रंगत असतात. त्यामुळे कित्येक स्टार त्यांचे खासगी आयुष्य कायम गुपीत ठेवण्याचा प्रयत्न करतात. अभिनेता फरहान अख्तर दोन वर्षांपूर्वी पत्नी अधुनापासून विभक्त झाला होता. परंतु या मुद्दयावर त्याने कधीही भाष्य केले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्षांच्या सुखी संसारानंतर हे दोघे विभक्त झाले. सध्या फरहान शिबानी दांडेकरला डेट करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नेहमी त्याचे प्रेम व्यक्त करत असतो. फरहान सध्या 'द स्काय इज पिंक' चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. 


पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत त्याला पत्नीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ही गोष्ट मुलांना सांगणे किती कठीण होतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तो म्हणला, 'फार कठीण असतं मुलांना अशा गोष्टी सांगणं ज्यांचा ते स्वीकार करू शकत नाही. परंतु नकळत त्यांना सगळ्या गोष्टी कळत असतात. पण तरीही मुलांना सांगणं फार कठीण होतं.'


'द स्काय इज पिंक' चित्रपटात फरहान सोबत अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि झायरा वसीम देखील झळकणार आहे. या चित्रपटानंतर तो 'तुफान' चित्रपटात भूमिका साकारणार आहे.