स्त्री 2 नंतर मॅडॉक नवे चित्रपट घेऊन येत आहे. प्रत्येक चित्रपटाच्या शैली वेगळ्या आहेत. 2024च्या चित्रपटाप्रमाणेचं मॅडॉक फिल्म्स पुढील प्रोजेक्ट्समध्ये यश मिळवेल अशी अपेक्षा आहे. पाहुयात कोण कोणते नवे चित्रपट 2025 ते 2028मध्ये धुमाकूळ घालण्यास येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2025 मध्ये 2 नवीन चित्रपट
मॅडॉक फिल्म्सने जाहीर केले आहे की 2025 मध्ये 'थामा' आणि 'शक्ती शालिनी' या दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 'थामा' हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होईल, तर 'शक्ती शालिनी' 31 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यामध्ये हॉरर आणि सुपरनॅचरल घटक असतील. या दोन्ही चित्रपटाची वाट चाहते आतुरतेने पाहात आहे. थामा चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत रश्मिका मंधाना दिसणार आहे.


2026 मध्ये येणार हे 2 हॉरर चित्रपट
2026 मध्ये मॅडॉक फिल्म्स 'भेडिया 2' या चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित करणार आहे. 'भेडिया 2' हा चित्रपट 14 ऑगस्ट 2026 रोजी प्रदर्शित होईल. त्यासोबतचं 'चामुंडा' हा चित्रपच देखील येत आहे. 'चामुंडा' 4 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


2027 मध्ये येणार 'स्त्री 3' आणि 'मुंज्या 2'
'स्त्री 3' आणि 'मुंज्या 2' यांचे सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 'स्त्री 3' 13 ऑगस्ट 2027 रोजी प्रदर्शित होईल, तर 'मुंज्या 2' (महा मुंज्या) 24 डिसेंबर 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे.


हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/junaid-khans-loveyapa-a-unique-strategy-to-release-the-song-without-releasing-the-films-trailer/874596


2028 मध्ये दोन महत्त्वाचे चित्रपट
मॅडॉक फिल्म्सने 2028 मध्ये दोन महत्त्वाचे चित्रपट जाहीर केले आहेत. 'पहला महायुद्ध' हा चित्रपट 11 ऑगस्ट 2028 रोजी प्रदर्शित होईल, तर 'दुसरा महायुद्ध' 18 ऑक्टोबर 2028 रोजी पडद्यावर येणार आहे. हे दोन्ही चित्रपट ऐतिहासिक प्रकारचे असतील आणि जागतिक युद्धांच्या विषयावर आधारित असतील.



मॅडॉक फिल्म्सचे मिशन
मॅडॉक फिल्म्सचे मुख्य मिशन हे प्रेक्षकांना नवीन, आव्हानात्मक आणि रोमांचक चित्रपट देणे आहे, जे विविध शैली आणि कथा समाविष्ट करतात. हॉरर-कॉमेडी, सुपरनॅचरल, ऐतिहासिक आणि अ‍ॅक्शन-थ्रिलर सारख्या विविध प्रकारांमध्ये मॅडॉक फिल्म्स आगामी वर्षांमध्ये प्रेक्षकांना नवनव्या अनुभवांसाठी तयार करेल. 


तसेच, मॅडॉक फिल्म्सने आपल्या चित्रपटांचा दर्जा कायम ठेवत, नवनव्या कलेला प्रोत्साहन देणे आणि भारतीय सिनेमा विश्वात एक नवीन दिशा देण्याचा निर्धार केला आहे.