सिद्धार्थ शुक्लासोबत ब्रेकअप झाल्यानंतर शिल्पा शिंदेने सोडलं मौन; अभिनेत्यावर मारहाणीचा आरोप
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या टीव्ही शोपेक्षा तिच्या वादामुळे जास्त चर्चेत असते.
मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री शिल्पा शिंदे तिच्या टीव्ही शोपेक्षा तिच्या वादामुळे जास्त चर्चेत असते. अशा परिस्थितीत आज आम्ही शिल्पा शिंदे आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्या लव्हस्टोरी आणि ब्रेकअपबद्दल सांगणार आहोत. जेव्हा सिद्धार्थ शुक्ला बिग बॉस 13 चा विजेता बनला. तेव्हा शोच्या फिनालेपूर्वी शिल्पा शिंदेने अभिनेत्यासोबतच्या तिच्या नात्यावरून पडदा हटवला.
शिल्पा शिंदेने यावेळी खुलासा केला होता की, तिला कसं अपमानास्पद नातेसंबंधात राहावं लागलं. एवढंच नाही तर शिल्पाने यावेळी सिद्धार्थबद्दल अगदी उलटसुलट गोष्टीही बोलल्या होत्या.
अभिनेत्रीने यावेळी सांगितलं होतं की, तिने 2011 मध्ये सिद्धार्थ शुक्लाला डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, सिद्धार्थ शुक्ला आणि शिल्पा शिंदे कधीही एकत्र दिसले नाहीत आणि सोशल मीडियावर त्यांचे एकत्र फोटोही नाहीत.
एका मुलाखतीदरम्यान खुलासा करताना शिल्पा शिंदे म्हणाली होती की, सिद्धार्थ शुक्ला आपल्या नात्याबद्दल खूप गंभीर होता. इतकंच नाही तर त्याला छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायचा. शिल्पा शिंदे पुढे म्हणाली की, एकदा सिद्धार्थ चालत्या गाडीतच तिच्यावर रागावला होता.
शिल्पाच्या आरोपांवर सिद्धार्थने अशी प्रतिक्रिया दिली होती
रागाच्या भरात सिद्धार्थने तिला कारमधून ढकललेलं. महिलांसोबत असं वागणाऱ्याला बिग बॉसचा विजेता कसा बनवण्यात आलं?, असंही शिल्पाने म्हटलं आहे. अनेकदा सिद्धार्थ शुक्ला तिच्यावर हात उगारत असे, असंही शिल्पा शिंदे म्हणाली होती.
अभिनेत्री म्हणाली की, दोघांचं ब्रेकअप झालं कारण सिद्धार्थ तिच्यावर हात उचलायचा. मात्र, शिल्पाच्या या सर्व आरोपांवर सिद्धार्थ शुक्लानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्याचा शिल्पाशी काहीही संबंध नसल्याचं सिद्धार्थने सांगितलं. शिल्पाचे आरोप ऐकून सिद्धार्थ संतापला होता.