मुंबई : बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोप्रा. ग्लोबल स्टार म्हणून ओळखली जाणरी प्रियंका सध्या भडकली आहे. तिच्या रागाचं कारण देखील तितकचं मोठं आहे. 'देसी गर्ल'ने तिचा राग संपूर्ण देशासमोर व्यक्त केला. प्रियंका आज यशाच्या उंच शिखरावर फक्त आणि फक्त तिच्या मेहनती आणि जिद्दीमुळे पोहोचली आहे. असं असताना देखील प्रियंकाला पती निक जोनसच्या नावावरून ओळखलं जात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रियंका सध्या आगामी 'द मॅट्रिक्स रिसरेक्शन्स' या हॉलिवूड सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दरम्यान एका वृत्तपत्राने प्रियंकाचा उल्लेख अभिनेत्री म्हणून न करता 'निक जोनसची पत्नी' केल्यामुळे तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला.  ही गोष्ट प्रियंकाला खटकली. 



या गोष्टीचा विरोध करत तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. प्रियंका म्हणाली, 'मी सर्वात मोठ्या सिनेमाच्या फ्रँचाईसचं प्रमोशन करत आहे. तरी देखील माझा उल्लेख नीक जोनसची पत्नी म्हणून केला जात आहे. त्यामुळे कृपया मला सांगा, आज देखील महिलांसोबत असं का घडतं....'


एवढंच नाही तर माझ्या बायो मध्ये मी आता IMDB लिंक देखील जोडायला हवी का? असा प्रश्न ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने उपस्थित केला. सध्या प्रियंकाची ही पोस्ट  सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.