मुंबई : कच्चा बादाम गर्ल अंजली अरोरा कंगना राणौतच्या टीव्ही रिएलिटी शो 'लॉक अप' मधून चांगलीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिला ट्रोलचा सामना करावा लागत आहे. काही काळापूर्वी सोठशल मीडियावर एक एमएमएस व्हिडिओ व्हायरल झाला होता. जो अंजलीचा असल्याचं सांगण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ आपला नसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं, पण असं असूनही तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल व्हावं लागलं. दरम्यान, आता तिने एक व्हिडिओ शेअर करून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.


कपिल शर्मा शोचा व्हिडिओ शेअर केला
अंजली अरोराने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर 'द कपिल शर्मा शो'चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सुमोना चक्रवर्ती कविता वाचताना दिसत आहे. ती म्हणते- ''वादळातही आपला दिवा का जळत आहे याची शत्रूंना काळजी वाटते.'' अंजलीने शेअर केलेल्या या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे की, याद्वारे ती ट्रोल करणाऱ्यांना फटकारत आहे.



अंजली अरोरा नुकतीच मुंबईतील हाजी अली दर्ग्याला भेट दिली होती, परंतु एमएमएस लीक झाल्यानंतरही तिला ट्रोलचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी, नुकतीच ती पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचली होती. त्यावेळी ती खूपच ग्लॅमरस ड्रेसमध्ये दिसली होती, पण त्यावरही अनेक यूजर्सनी तिला ट्रोल केलं. मात्र, आता सुमोना चक्रवर्तीचा हा व्हिडिओ शेअर करून तिने ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.