मुंबई : 'RRR'च्या यशानंतर अभिनेता राम चरणची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्याच्या दमदार अभिनयामुळे तो लोकप्रिय झाला आहे. रामचरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, त्याचं हॉलीवूडच्या प्रोजेक्टबाबत बोलणं सुरु आहे.राम चरणनं दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच बॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामचरण लवकरच हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाऊल ठेवणार असे मिडिया रिपोर्अटनुसार समजलं आहे. नुकत्याच एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, तो हॉलीवूडच्या प्रकल्पाबाबत त्याचे बोलणे झाले आहे. राम चरणच्या आरआरआर या चित्रपटाला भारतातच नाही तर जगभरात लोकप्रियता मिळाली.


वृत्तानुसार, टॉलीवूड अभिनेत्याने असंही सांगितले आहे की, काही महिन्यांत त्याच्या हॉलीवूड प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली जाईल. याशिवाय त्याला ज्युलिया रॉबर्ट्स, टॉम क्रूझ आणि ब्रॅड पिट यांसारख्या हॉलीवूडच्या दिग्गजांसह काम करायचं आहे. या चर्चेने त्याचे चाहते नक्कीच आनंदी झाले आहे. जे आता 'RRR' स्टारला जागतिक स्टारच्या रुपात पाहण्याची वाट बघत आहे.''


डेव्हिड पोलंडने आयोजित केलेल्या  DP/30 या सीरीजमध्ये रामचरण दिसला तेव्हा, इथे तो म्हणाला, 'हॉलीवूडचा अभिनेता व्हायला कोणाला आवडत नाही? जग एकत्र येत आहे, ते एक होत आहे आणि मला वाटतं की सिनेमाही 'ग्लोबल सिनेमा' म्हणून ओळखला जाणार आहे. संस्कृतीची देवाणघेवाण, प्रतिभेची देवाणघेवाण सुरू झाली.  हे आता हॉलीवूड किंवा बॉलिवूड नाही. सर्व दिग्दर्शकांनी आम्हाला अभिनेते म्हणून अनुभवावे अशी माझी इच्छा आहे आणि मलाही तेच करायला आवडेल.  


'RRR' या चित्रपटातील 'नाटू नाटू' हे गाणे ऑस्कर 2023 साठी नामांकन मिळालं आहे. गुड मॉर्निंग अमेरिका आणि क्लटा एंटरटेनमेंट या दोन लोकप्रिय हॉलिवूड टॉक शोमध्ये अभिनेता अलीकडेच त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना दिसला. याशिवाय 'आरआरआर'च्या निर्मात्यांनी एक खास स्क्रीनिंगही आयोजित केले होतं.राम चरण एका चित्रपटासाठी जवळपास 12 कोटी मानधन घेतो.गेम चेंजर या चित्रपटामधून राम चरण प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.