Border 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलच्या 'बॉर्डर' या चित्रपटात भारतीय सेनेच्या कधी न ऐकलेल्या गोष्टी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळाल्या. त्याच्या 'बॉर्डर' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. खरंतर, 'गदर 2' ला मिळालेल्या यशानंतर सनी देओलनं 'बॉर्डर 2' ची घोषणा केली होती. एकएक करून या चित्रपटातील कलाकारांची नावं समोर येत आहेत. मात्र, आता जे नाव समोर आलं आहे त्यानं सगळ्यांना आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाला आहे. सनी देओलनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या नवीन कलाकाराच्या नावाची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या कलाकाराच्या नावाची घोषणा करत एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. तर या प्रोमोमधून हे स्पष्ट झालंय की कोण कलाकार आहे. तर तो दुसरा कोणी नसून दिलजीत दोसांझ आहे.प्रोमोमध्ये सुरुवातीला सोनू निगमच्या आवाजत असलेलं ओरिजनल बॉर्डर या चित्रपटातील गाणं 'संदेसे आते हैं' प्ले होतं. त्यानंतर दिलजीत दोसांझचं नाव समोर येतं. या प्रोमोमध्ये दिलजीतच्या आवाजात एक डायलॉग देखील आहे. 'इस देश की तरफ उठने वाली हर नजर झुक जाती है खौफ से... इन सरहदों पर जब गुरु के बाज पहरा देते हैं!' हा दिलजीतचा डायलॉग ऐकूण कोणाच्याही अंगावर शहारे येतील असा आहे. तर हा प्रोमो शेअर करत सनीनं कॅप्शन दिलं की 'फौजी तुझं स्वागत आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सनी शिवाय दिलजीतनं देखील त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा प्रोमो व्हिडीओ शेअर करत त्याच्या या चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रोमो शेअर करत 'पहली गोली दुश्मन चलाएगा और आखिरी गोली हम! इतक्या मोठ्या आणि भव्य टीमसोबत एकत्र येऊन मला खूप आनंद होतोय. त्याशिवाय सैनिकांनी केलेल्या सगळ्या गोष्टी दाखवण्याची संधी मिळते यासाठी मी स्वत: ला खूप भाग्यवान समजतो, असं कॅप्शन दिलजीतनं दिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

कधी केली होती चित्रपटाची घोषणा? 


सनी देओलनं जून महिन्यात या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली होती. त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या जे.पी.डी दत्ता यांच्या 'बॉर्डर' चित्रपटातील सैनिकाची भूमिका पुन्हा एकदा साकारण्यासाठी तो सज्ज आहे आणि चित्रपटाचा सीक्कल आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अनुराग सिंग करणार आहेत. तर सनीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं की '27 वर्षांपूर्वी एका सैनिकानं वचन दिलं होतं की तो परत येईल. तेच वचन पूर्ण करण्यासाठी आणि हिंदुस्तानच्या मातीला सलाम करण्यासाठी येत आहे.'


हेही वाचा : VIDEO : 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली साई पल्लवी!


दरम्यान, अधिकृत घोषणेनंतर निर्मात्यांनी या चित्रपटाच्या कास्टिंगची घोषणा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत आयुष्मान खुराना आणि वरुण धवनच्या नावाची घोषणा केली. तर 'बॉर्डर 2' हा चित्रपट भारतातील सगळ्यात मोठा वॉर सिनेमा असणार असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, हा चित्रपट पुढच्यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.