VIDEO : 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली साई पल्लवी!

Sai Pallavi Dance on Marathi Song Apsara Aali : साई पल्लवीचा बहिणीच्या लग्नातील या डान्सनं वेधलं सगळ्यांचं लक्ष...

दिक्षा पाटील | Updated: Sep 10, 2024, 10:52 AM IST
VIDEO : 'अप्सरा आली' या मराठी गाण्यावर बेभान होऊन नाचली साई पल्लवी! title=
(Photo Credit : Social Media)

Sai Pallavi Dance on Marathi Song Apsara Aali : दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी ही गेल्या अनेक दिवसांपासून तिचा आगामी चित्रपट 'रामायण' ला घेऊन चर्चेत आहे. तिच्या साधेपणासाठी आणि तिच्या लूक्समुळे ती नेहमीच चर्चेत असते. या सगळ्यामुळे दिवसेंदिवस तिच्या चाहत्यांची संख्या ही वाढताना दिसते. साई ही फक्त एक उत्तम अभिनेत्री नाही तर त्यासोबत एक उत्तम डान्सर देखील आहे. दरम्यान, सध्या साईचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्याचं कारण म्हणजे साई पल्लवीनं चक्क मराठी गाण्यावर डान्स केला आहे. 

साईचा हा व्हिडीओ तिच्या फॅनपेजनं आधीच्या ट्विटर आताच्या X अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत साई तिच्या बिन्धास्त अंदाजात डान्स करताना दिसते. साई पल्लवीचा हा व्हिडीओ तिची बहीण पूजा कननच्या लग्नातील आहे. या व्हिडीओत साई आणि तिची बहीण मराठमोळ गाणं 'अप्सरा'वर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत साईनं पिकॉक ब्लू आणि ऑफ व्हाईट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर साईनं दिलेल्या हावभावांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यासोबत साई या गाण्यावर लिप्सिंग करताना दिसत आहे. त्यामुळे तिच्या मराठमोळ्या चाहत्यांना खूप जास्त आनंद झाला आहे. साईच्या या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी तिची स्तुती करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : KBC 16: 1 कोटींपर्यंत पोहोचला पण ठरला नाही करोडपती... तुम्ही देऊ शकता का? 'या' प्रश्नाचं उत्तर

साईच्या कामाविषयी बोलायचं झालं तर ती लवकरच नितेश तिवारी यांचा चित्रपट 'रामायण' ची शूटिंग करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. साई पल्लवीच्या या चित्रपटाला घेऊन प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल देखील झाले होते. त्याशिवाय तिच्याकडे 'अमरन' हा चित्रपट आहे. या चित्रपटाशिवाय ती 'थंडेल' मध्ये दिसणार आहे.