मुंबई : सारा अली खान ही बॉलीवूड अभिनेत्री आहे जिला प्रवासाची आवड आहे आणि तिची सर्व धर्मांवर अपार श्रद्धा आहे. ती तिच्या चित्रपट आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. सारा अली खान नेहमीच वेगवेगळ्या देवस्थानांना भेट देताना दिसून येते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सारा अली खान तिच्या लग्नामुळे चर्चेत होती. तिचा ब्राईडल लुकमधील एक फोटो तुफान व्हायरल झाला होत्या. त्यामुळे साराने गुपचुप लग्न केल्याचं बोललं जात होतं. देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी ती नेहमी एका व्यक्तीसोबत मंदिरात जाताना दिसते. यामुळेच अदा सारा सगळ्यांचं लक्षवेधून घेते.



आता सारा पुन्हा एकदा महाकालच्या दरबारात पोहोचली, यावेळी ती एकटी नव्हती तर तिच्यासोबत तिची आई अमृता सिंह देखील होती.


सारा अली खानने नुकतेच आई अमृता सिंग यांच्यासोबत महाकालचे दर्शन घेतले. सकाळी दहाच्या सुमारास ती मंदिरात पोहोचली आणि नंदी हॉलमध्ये बसून ओम नमः शिवाय मंत्राचा जप केला. यानंतर त्यांनी सकाळी 10.30 वाजता आरतीही केली.


सारा अली खानने संपूर्ण महाकाल मंदिर परिसराचा दौरा केला आणि तलावाच्या काठावर बसून मंदिर परिसर पाहिला. सारा अली खानने इंस्टाग्रामवर अनेक फोटो शेअर केले आहेत.फोटोत ती महाकालच्या मंदिराबाहेर बसली आहे, तिची आईही तिच्यासोबत आहे. दोघांनीही कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घातले आहेत.



फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये 'आई आणि महाकाल' असे लिहिले आहे. #jaimahakal #jaibholenath. चाहते तिच्या फोटोंवर भरपूर कमेंट करत आहेत.


तिचा ब्राईडल लुकमधील फोटो हा एका सेटवरचा होता. सिनेमाच्या शुटींगदरम्यान तिने नव्या नवरीची भूमिका साकारली होती.