मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. मात्र डेब्यू करायच्या अगोदरच अहान आपल्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अहान आपल्या गर्लफ्रेंड तानिया श्रऑफसोबत स्पॉट झाला. अहान आपल्या गर्लफ्रेंड तानियासोबत मुंबईतील एका थाय रेस्टॉरंटमध्ये डिनरला आला होता. या अगोदरही तानिया आणि अहान एकत्र दिसले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दोघं एकमेकांना खूप काळापासून डेट करत आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तानिया भारतात राहत नसून ती परदेशात राहते. तानियाने आतापर्यंत अनेक मॅगझिनकरता मॉडलिंग केलं आहे. हल्लीच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ELLE इंडिया ऑफिशिअल करता फोटो शूट केल्याचे फोटो टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच सुनील शेट्टीने तानिया अहानची गर्लफ्रेंड असल्याचं कन्फर्म केलं होतं. 





अहानबद्दल सुनील शेट्टी काय म्हणतो


सुनील शेट्टी म्हणतो की, अहान माझ्यापेक्षा चांगला कलाकार आहे. लोकांनी सुनील शेट्टीची अहानसोबत केलेल्या तुलनेमुळे तो अजिबात नाराज नाही. तो माझ्यापेक्षा उत्तम अभिनेता आहे. म्हणून या तुलनेकडे मी लक्ष देत नाही. जर प्रेक्षक त्याला स्वीकारत असतील आणि नशीब त्याच्यासोबत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.