मुंबई : रश्मिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ AI च्या मदतीनं तयार करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.  पत्रकार आणि रिसर्चर अभिषेक यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत रश्मिका मंदाना आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. तर उत्सुकतेनं ती लिफ्टमध्ये घुसताना दिसते. अनेकांना हा व्हिडीओ पाहिल्यानंतर ती रश्मिका आहे असे वाटले, मात्र ती रश्मिका नाही. या व्हिडीओत दिसणार मुलगी ही जारा पटेल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जारा ही ब्रिटिश-इंडियन आहे. तिनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 415K फॉलोअर्स आहेत. AI च्या Deepfake टेक्नॉलॉजीच्या मदतनं या त्या मुलीच्या चेहऱ्याच्या जागी रश्मिकाचा चेहरा लावण्यात आला आहे. इतकंच नाही तर हा व्हिडीओ खरा असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे खरा व्हिडीओ कोणता आणि खोटा हे कळत नाही आहे. मात्र, अभिषेक यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून जारा पटेलचा खरा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे रश्मिकाचा हा फेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियालर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या सगळ्यानंतर रश्मिकाने तिच्या पोस्टद्वारे तिची रिएक्शन दिली आहे.



"मला हे शेअर करताना खूप वाईट वाटत आहे आणि माझा डीपफेक व्हिडिओ ऑनलाइन पसरवला जात आहे ज्याबद्दल मला बोलायचं आहे. प्रामाणिकपणे, असं काहीतरी अत्यंत भीतीदायक आहे फक्त माझ्यासाठीच नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकासाठी जे आज खूप नुकसानास बळी पडत आहेत. कारण तंत्रज्ञानाचा असा दुरुपयोग होत आहे."



ती पुढे म्हणाली, "आज, एक महिला आणि एक अभिनेत्री म्हणून मी माझं कुटुंब, मित्र आणि हितचिंतक यांची आभारी आहे जे माझं संरक्षण आणि सपोर्ट सिस्टीम आहेत. पण जर मी शाळा किंवा कॉलेजमध्ये असताना माझ्यासोबत असं काही घडलं असतं, तर मी खरोखर हे करू शकले नसते. कल्पना करू शकत नाही की, मी हे कसं हाताळू शकले असते त्यावेळी. आणखी कोणी या खोट्या प्रकरणाचा शिकार होईल, त्याआधी आपण एक समाज म्हणून यावर बोलायला हवं.'' असं बोलत रश्मिकाच्या या व्हिडीओवर प्रतिक्रीया दिली आहे.